Today Gold Rate: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला! १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Today Gold Rate Hike: सोन्याच्या दराने आज उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२६० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On
Summary

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे उच्चांक गाठला

आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४,००० रुपये

प्रति तोळ्यामागे १,२६० रुपयांची वाढ

सोन्याच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. मध्यंतरी सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

Today Gold Rate
Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

सध्या नवरात्र सुरु आहे. अवघ्या काही दिवसात दसरा येणार आहे. दसऱ्याला सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण सोनं खरेदी करतात.परंतु यावर्षी सोने खरेदी करण्याकडे ग्राहक पाठ फिरवतील, असं सांगण्यात येत आहे. सोन्याचे दर जवळपास १ लाख १४ हजार रुपये झाले आहेत. त्यामुळे यंदा दसऱ्याला सोने खरेदीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजदेखील सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आजचे सोन्याचे दर वाचा.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर १,१४,३३० रुपये आहेत. या दरात कालच्या तुलनेत १,२६० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १००८ रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर सध्या ९१,४६४ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १२,६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या ११,४३,३०० रुपये आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०४,८०० रुपये आहेत. या दरात १,१५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८३,८४० रुपये झाले आहेत. या दरात ९२० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,४८,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ९४० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे तुम्हाला ८८,७५० रुपये मोजावे लागणार आहेत. ८ग्रॅममागे ७५२ रुपयांची वाढ झाली असून हे दर ६८,६०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ९,४०० रुपयांची वाढ झाली असून हे दर ८,५७,५०० रुपये झाले आहेत.

Today Gold Rate
Today Gold Rate : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला; ३ आठवड्यांत ७००० रुपयांची वाढ, १ तोळ्याचा भाव काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com