दसऱ्याआधीच सोनं महागलं, दरात कमालीची उच्चांकी; २४ कॅरेट सोन्याच्या भावात किती रूपयांची वाढ?

Gold Prices Hit Record: दसऱ्याआधीच सोनं महागलं आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात तब्बल १४,२०० रूपयांची वाढ झाली आहे. खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On
Summary
  • दसऱ्याआधीच सोनं महागलं.

  • २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात १४,२०० रूपयांची वाढ.

  • खरेदीदारांच्या खिशाला झळ.

नवरात्रीनंतर दसरा आहे. दसऱ्याला आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, दसऱ्याला काही दिवस शिल्लक असताना सोन्याच्या दरानं कमालीची उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित. १० तोळं सोन्याच्या दरात १४,२०० रूपयांची वाढ झाल्याचे वृत्त आहे.

आज मंगळवार. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या दरानं कमालीची उच्चांकी गाठली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,४२० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१८,३१० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १४,२०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ११,८३,१०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
ती मांडीवर बसली, त्यानं हवेत उचलून KISS घेतला; गरब्यातील प्रतापामुळे कपलला देश सोडावा लागला, VIDEO व्हायरल

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,३०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०८,४५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १३,००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला १०,८४,५०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
पुण्यातील उच्चभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय; मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींचा काळा धंदा

२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,०६० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८८, ७३० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १०, ६०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ८,८७,३०० रूपये मोजावे लागतील.

Today Gold Rate
टर्न घेतला अन् कार थेट खड्ड्यात कोसळली; पुण्यातील कार अपघातात एकाचा मृत्यू | VIDEO

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. प्रति किलो चांदीच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५१,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com