पुण्यातील उच्चभ्रू परिसरात देहविक्रीचा व्यवसाय; मसाज पार्लरच्या नावाखाली तरूणींचा काळा धंदा

Pune Police Bust Brothel Racket: पुण्यातील उच्चभ्रू खराडीतील सनशाईन स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून मॅनेजरला अटक केली.
Pune Police Bust Brothel Racket
Pune Police Bust Brothel RacketSaam Tv News
Published On
Summary
  • पुण्यातील खराडी परिसरात काळा धंदा.

  • मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय.

  • ३ तरूणींची सुटका, मॅनेजर अटकेत.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची घटना उडकीस आली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली. तसेच महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी स्पा चालक, व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागातील SUN SHINE SPAमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांना मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त आधारे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Pune Police Bust Brothel Racket
मंदीचं सावट? TCS मधून ८०,००० जणांना काढल्याचं वृत्त, आयटी क्षेत्रात खळखळ

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. खराडी पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना रेड हॅण्ड पकडलं. पोलिसांनी याप्रकरणी स्पा चालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी ३ तरूणींची सुटका केली. संदीप चव्हाण, रोहीत शिंदे, स्पाचे मॅनेजर गोपाळ आणि स्वाती उर्फ श्वेत्ता विजय सुर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Pune Police Bust Brothel Racket
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकावर भररस्त्यात हल्ला, आरोपींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचाही समावेश

खराडी पोलिसांनी आरोपींविरोधात चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. उच्चभ्रू खराडी परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com