Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Gold Rate Today Hike: सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सोन्याचे दर १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

सोन्याचे दर १ तोळ्यामागे १,१५० रुपयांची वाढ

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका

२०२६ मध्ये सोन्याचे दर कमी होती, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार होत आहे आज तर सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर १ तोळ्यामागे १,१५० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. त्याचसोबत आता पुढच्या आठवड्यात मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रांतीला अनेकजण सोनं खरेदी करतात. त्यामुळे सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहेत.

सोन्याचे दर किती? (Gold Rate Today)

आज सोन्याचे दर १,४०,४६० रुपये झाले आहेत. या दरात १,१५० रुपयांची वाढ झाली आहे. तर ८ ग्रॅममागे ९२० रुपयांनी वाढ झाली असून हे दर १,१२,३६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ११,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १४,०४,६०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १०५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२८,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ८४० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,०३,००० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १२,८७,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ८६० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,३४० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे ६८८ रुपयांची वाढ होऊन हे दर ८४,२७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १०,५३,४०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स संपला? आठवलेंचं नाव निश्चित, भाजपकडून ३ जागांवर कुणाला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT