Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

24K 22K 18K gold rates Mumbai Pune : देशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमती वाढल्या असून जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे दर विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत.
Gold Price
Gold- Silver Price TodaySaam tv
Published On

Gold Rate in India, Gold Price Today; 18k, 22k, 24k Gold Rates Mumbai Pune : देशातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ६६० रूपयांनी वाढल्याची नोंद झाली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि सोन्याच्या गुंतवणुकीत झालेल्या वाढीमुळे किंमती गगणाला भिडल्या आहेत. मागली दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळेच देशांतर्गत सोन्याच्या किमती विक्रमी पातळीजवळ आहेत. (Gold Rate Today in India: 18K, 22K, 24K Gold Prices Rise in Mumbai, Pune)

भारतात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹१३,९६३ वर पोहोचली आहे. तर देशात सर्वाधिक वापरले जाणारे २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹१२,८०० वर आणि १८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹१०,४७६ वर आहे. मंगळवारच्या तुलनेत किमतींमध्ये थोडीशी वाढ नोंदवण्यात आली आहे. १८ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम ४९ रूपयांनी वाढलेय. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ६६ रूपयांनी वाढ नोंदवण्यात आली. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ६० रूपयांनी वाढली आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील तणाव आणि डॉलर मजबूत होत असल्याने येत्या काळात किमतींमध्ये अस्थिरता कायम राहू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

Gold Price
Maharashtra politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार! अजित पवारांनी दिले राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत, दादा नेमकं काय म्हणाले?

२४ कॅरेट सोन्याची किंमत -

१ ग्रॅम: आज ₹१३,९६३ | काल ₹१३,८९७ | वाढवा ₹६६

१० ग्रॅम: आज ₹१,३९,६३० | काल ₹१,३८,९७० | वाढवा ₹६६०

२२ कॅरेट सोने

१ ग्रॅम: आज ₹१२,८०० | काल ₹१२,७४० | ₹६० वाढवा

१० ग्रॅम: आज ₹१,२८,००० | उद्या ₹१,२७,४०० | ₹६०० वाढवा

१८ कॅरेट सोने

१ ग्रॅम: आज ₹१०,४७६ | काल ₹१०,४२७ | ₹४९ वाढवा

१० ग्रॅम: आज ₹१,०४,७६० | काल ₹१,०४,२७० | वाढवा ₹४९०

Gold Price
Zilla Parishad election date : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट, वाचा नेमका कधी उडणार धुरळा

भारतातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर (१ ग्रॅम) -

दिल्लीत १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १३,९६३ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १२,८०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १०,४७६ रुपये होता.

मुंबई, पुणे, जळगावात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१३,९४८ आहे, २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१२,७८५ आहे आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ₹१०,४६१ आहे.

अहमदाबादमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १३,९५३ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १२,७९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १०,४६६ रुपये होता.

कोलकातामध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१३,९४८ आहे, २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१२,७८५ आहे आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ₹१०,४६१ आहे.

मेरठमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १३,९६३ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १२,८०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १०,४७६ रुपये आहे.

लखनौमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१३,९६३ आहे, २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१२,८०० आहे आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ₹१०,४७६ आहे.

जयपूरमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोने १३,९६३ रुपयांच्या पातळीवर आहे, २२ कॅरेट सोने १२,८०० रुपयांच्या पातळीवर आहे आणि १८ कॅरेट सोने १०,४७६ रुपयांच्या पातळीवर आहे.

पटनामध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोने १३,९५३ रुपयांना, २२ कॅरेट सोने १२,७९० रुपयांना आणि १८ कॅरेट सोने १०,४६६ रुपयांना उपलब्ध आहे.

Gold Price
Maharashtra Politics : महाराष्ट्र हादरला! राजकीय वादातून काँग्रेसच्या नेत्याची हत्या, धारदार शस्त्राने भरचौकात वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com