Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Hike: अक्षय्य तृतीयेला सोन्याचे भाव गगनाला भिडले! मागच्या वर्षीच्या तुलनेत २४ हजारांनी वाढ

Jalgaon Gold Rate Hike Today On Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे भाव २४ हजारांनी वाढले आहेत. त्यामुळे सोने खरेददीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

Siddhi Hande

आज अक्षय्य तृतीया आहे. साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी केलेले चांगले असते. त्यामुळे सोनाराच्या दुकानात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आजही सोने घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. दरम्यान, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी सोन्याच्या किंमतीत २४ हजारांनी वाढ झाली आहे.

जळगावातील सोन्याचे भाव (Jalgaon Gold Rate)

अक्षय तृतीयेनिमित्त सुवर्णनगरीत म्हणजेच जळगावमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव आज जीएसटीसह 99 हजार 498 इतके चांदी एक लाख 940 रुपये झाली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्यात 24 हजारांची वाढ झाली आहे.

अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या स्वर्ण बाजारात ग्राहकांनी केल आहे. आजचे सोन्याचे भाव जीएसटी सह 99 हजार 498 इतके आहे यंदाच्या अक्षय्य तृतीयामध्ये भाव वाढल्यामुळे ग्राहकांचे मात्र बजेट कोलमडले आहे.

पुण्यात सोन्याचे भाव

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचे खूप विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी लोक सोने आणि चांदी खरेदी करतात. त्यामुळे आज सकाळपासून पुण्यातील लक्ष्मी रोड वर असलेल्या अनेक सराफा दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. सोनं काहीसं महाग जरी झालं असलं तरी सुद्धा आजचा मुहूर्त महत्वाचा असल्याचं ग्राहक सांगतात तसंच भाव वाढले असले तरी सुद्धा ग्राहकांची सोन्या प्रति असलेली भावना कायम आहे असं विक्रेते सुद्धा सांगताना पहायला मिळतायत.

दरवर्षी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होते. मात्र, आज सोन्याचे भाव १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे मात्र, ग्राहकांनी सोने खररेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मात्र, ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT