सोन्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. आजही सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याची चकाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्याचे भाव ११० रुपये प्रतितोळा वाढले आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today:
आज १ तोळा सोन्याचे दर ९९,१७० रुपये आहेत. या भावात ११ रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७९,३३६ रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ९,९१,७०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर १०० रुपयांनी वाढले आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९०,९०० रुपये आहे. तर ८ग्रॅम सोन्याचे दर ७२,७२० रुपये झाले आहेत.या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे.१८ कॅरेट सोन्याचे दर ७४,३८० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,५०४ रुपये आहे. सोन्याचे दर दोन दिवसांपूर्वी ४०० रुपयांनी वाढले आहे. आज हे दर साधारणपणे १०० रुपयांनी वाढले आहेत.
चांदीचे दर (Silver Rate)
आज चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. १० ग्रॅम चांदी १०२० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीच्या दरात १९० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १०,२०० रुपये झाले आहेत.चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.