.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुरूवारी सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. याआधी मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली होती. दरम्यान आज सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या लग्नाचा सिझन आहे. ग्राहक या काळात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे याचा फायदा निश्चितच ग्राहकांना होईल.
२४ कॅरेट सोन्याचा दर
सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रूपयांनी घसरून ९४,०८० रूपये झाला आहे. तर, १०० ग्रॅम सोन्याचा दर २१,३०० रूपयांनी घसरून ९,४०,८०० रूपये झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर तब्बल १९५० रूपयांनी घसरून ८६,२५० वर आला आहे. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा दर १९,५०० ने घसरून ८,६२,५०० रूपयांवर पोहोचला आहे. ही किंमत गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत किती?
आज सराफा बाजारात १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६०० रूपयांनी घसरून ७०,५७० रूपये झाला आहे. तर, १०० ग्रॅम १६००० रूपयांनी घसरून ७,०५,७०० झाला आहे. देशभरात प्रति १ ग्रॅम कॅरेट सोन्याची किमंत ७,०५७ रूपयांवर आली आहे. तर, बुधवारी १८ कॅरेट सोन्याचा १ ग्रॅमचा भाव ७,२१७ रूपयांवर आला आहे.
आजचा चांदीचा भाव
गुरूवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज १०० ग्रॅम चांदीचा दर ९० रूपयांनी घसरून ९७०० रूपयांवर आला आहे. तर, १ किलो चांदीचा दर ९०० रूपयांनी घसरून ९७,००० रूपयांवर आला आहे. आज देशभरात १० ग्रॅम चांदीचा दर ९७० रूपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.