Gold Rates: १ किलो सोन्यामध्ये १९९० मध्ये Maruti 800 मिळायची, आता BMW; बघा किंमत कशी बदलली

The Luxury Buying Power of 1 Kilo of Gold: गेल्या काही दशकांत सोन्याच्या किमतींनी घेतलेली झेप पाहता, हे स्पष्ट होतं की सोनं केवळ मौल्यवान धातू नाही, तर एक आर्थिक शक्ती बनली आहे.
Gold Price
Gold PriceSaam Tv
Published On

सोन्याची चमक नेहमीच गुंतवणूकदारांना आणि खरेदीदारांना आकर्षित करत आली आहे. पंरतू गेल्या काही दशकांमध्ये सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सोने हे केवळ मौल्यवान धातू राहिले नाही तर, एक संपत्ती बनली आहे.

काही महिन्यांपूर्वी १० तोळं सोन्याचा दर १ लाखांवर पोहोचला होता. मात्र, हळूहळू सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र आहे. १ किलो सोन्याच्या किमतीत आपण बऱ्याच गोष्टी खरेदी करू शकतो. १ किलो सोनं विकून आपण बीएमडब्ल्यू किंवा ऑडीसारखी लक्झरी कार देखील खरेदी करू शकतो.

१९९० साली सोन्याचा दर आजच्या तुलनेत फार कमी होता. १९९० साली १ किलो सोनं विकल्यानंतर त्या पैशात आपण मारूती ८०० ही कार विकत घेऊ शकले असता. आजच्या घडीला १ किलो सोन्याची किंमत तब्बल ८८.६७ लाख रूपये इतकी झाली आहे. आपण इतक्या पैशात ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू कार सहज खरेदी करू शकता.

Gold Price
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार

सेबी नोंदणीकृत विश्लेषक ए. के मानधन यांनी ट्विटरवर एक रोचक विश्लेषण मांडलं आहे. ज्यात त्यांनी १९९० पासून आजपर्यंत सोन्याच्या किमतींची तुलना कार्सच्या किमतींशी केली आहे.

1990- १ किलो सोनं - मारुती 800 (सुरुवातीची किंमत सुमारे ₹90,000)

2000- १ किलो सोनं - मारुती सुझुकी एस्टीम

2005- १ किलो सोनं - टोयोटा इनोव्हा

2010- १ किलो सोनं - टोयोटा फॉर्च्युनर

2019- १ किलो सोनं - BMW X1

2025- १ किलो सोनं - BMW X3 / Audi A6 / Mercedes GLA (₹85–₹98 लाख)

Gold Price
BJP: अवैध संबंधासाठी पत्नीचा छळ; अद्दल घडवण्यासाठी दाजीची मदत, BJP नेत्याच्या मुलाचा गर्लफ्रेंडसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केला अन्...

१ किलो सोन्याच्या दरात केवळ कारच नव्हे, हेही खरेदी करता येऊ शकतं:

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये 3 BHK फ्लॅट

जागतिक टूर

Ducati / Harley-Davidson सारखी सुपरबाईक

ऑक्सफर्ड/हावर्डसारख्या कॉलेजमध्ये शिक्षण

डेस्टिनेशन वेडिंग

Virtu ब्रँडचा लक्झरी स्मार्टफोन

MRF चे ८० शेअर्स

छोटा पेट्रोल पंप / स्टार्टअप लाँच

खाजगी चार्टर्ड विमानाचं बुकिंग

२०४० पर्यंत सोन्याच्या किमतीत किती वाढ होईल?

मानधन यांच्या अंदाजानुसार, जर सोन्याच्या किमतीत अशीच वाढ झाली, तर कदाचित 2040 पर्यंत 1 किलो सोन्याच्या बदल्यात खाजगी जेट खरेदी करणं शक्य होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com