Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rates: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; १० तोळा ४,९०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold And Silver Rates Drop: आज, २५ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. १० ग्रॅम २४ कॅरेट सोनं ₹१,००,४८० आणि चांदी ₹१,१८,००० प्रति किलो इतकी झाली आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांत उच्चांकी गाठलेल्या सोन्यानं आज निच्चांकी गाठली आहे. आज शुक्रवार, २५ जुलै रोजी सोनं आणि चांदीचे दर घसरले आहेत. १ तोळ्यामागे ४९० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला १,००,४८० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,१०० इतकी आहे. तर, १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,३६० इतकी आहे. मात्र, चांदीचे दर १ लाखांवरच आहे.

१० तोळं सोन्याचा दर

सोन्याच्या दरात आज घसरण झाली. १० तोळं सोन्याच्या दरात ४,९०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळ्यासाठी १०,०४,८०० रूपये मोजावे लागणार आहे. तर, २२ कॅरेट १० तोळं सोन्यासाठी ९,२१,००० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५३,६०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या दरात घसरण का झाली?

अमेरिकेने अलीकडेच जपान आणि फिलीपिन्ससोबत नवीन व्यापार करार केला आहे. यामुळे जागतिक बाजारात असलेला तणाव काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या (सोनं) ऐवजी धोकादायक पण अधिक नफा देणाऱ्या गुंतवणुकींकडे (शेअर बाजार) वळू लागले आहेत. या ‘प्रॉफिट बुकिंग’मुळे सोन्याची मागणी थोडी कमी झाली आणि किंमतीत घसरण झाली.

भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

भारतात सोन्याची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर. आयात शुल्क आणि सरकारचे कर. डॉलर-रुपयाचे दर. देशांतर्गत मागणी आणि पुरवठा. भारतामध्ये सोनं केवळ गुंतवणुकीचा पर्याय नसून, सण-उत्सव, विवाह आणि धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात झालेल्या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT