Gold Price Drop Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ११४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर

Gold Price Drop Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत? हे जाणून घ्या...

Priya More

Summary -

  • दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ११,४०० रुपयांची घट

  • २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

दिवाळीमध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळाली. दिवाळीत सोनं खरेदीकडे नागरिकांचा कल जास्त असतो पण सोन्याचे दर महागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. पण आता दिवाळी संपताच सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली तर चांदीचे दर आहे तसेच राहिले आहेत. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ११,४०० रुपयांनी घट झाली आहे. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती ते एकदा वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,१४० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२४,४८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,४०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,४४,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आज तुम्हाला हे सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

२४ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,०५० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१४,१०० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं १,१५,१५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १०,५०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,४१,००० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं काल ११,५१,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८६० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९३,३६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,६०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,३३,६०० रुपये मोजावे लागतील. काल हेच सोनं ९,४२,२०० रुपयांना विकले गेले.

सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांची सुवर्णसंधी आहे. तर सोन्यापाठोपाठ चंदीच्या दराबाबत देखील महत्वाची अपडेट समोर आली आहे. चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीचे दर १,५५,००० रुपये इतका आहे. चांदीच्या दरात काहीच वाढ न झाल्यामुळे चांदी खरेदी करण्याची देखील आज चांगली संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भर दिवसा सराफ व्यावसायिकाचे लुटमार आणि अपहरणाची धक्कादायक घटना

Unseasonal Rain Damages: अवकाळीचा दुहेरी फटका! कांदा-मका पाण्यात|VIDEO

Guhagar Tourism: विकेंड ट्रीपसाठी परफेक्ट ठिकाण! मुंबईहून फक्त ५ तासांत पोहोचाल सुंदर गुहागरला

Ind vs Aus T20 : टी-20 मालिकेआधीच टीम इंडियासाठी खूशखबर; ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघाबाहेर

Farmer Death : दिवाळी साजरी करता आली नाही, मुलांना कपडे नाहीत, शेतकरी बापानं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT