Gold Price Today: १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आज २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?

Gold- Silver Price: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचे दर १३० रुपयांनी घसरले होते. तर आज सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आज फटका बसणार आहे.
Gold Price Today: १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आज २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?
Gold Price TodaySaam Tv
Published On

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. नेहमी सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असते पण आज सोन्याच्या दरात एका ग्रॅममागे फक्त ५ रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजे एका तोळ्यासाठी तुम्हाला ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेट १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज ९९,३३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे जीएसटीसह हे दर १ लाखापारच आहेत. आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी किती खर्च करावे लागणार हे आपण जाणून घेणार आहोत...

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळतो. कधी सोनं कमी होते तर कधी वाढते. आज सराफा मार्केट उघडताच सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. काल सोन्याचे दर कमी झाले होते. २४ कॅरेटचे प्रति तोळा सोन्याच्या दरात १३० रुपयांनी घट झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली असून याचा आजचा भाव ९९,३३० रुपये आहे. तर १० तोळ्यामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली असून यासाठी ९,९३,३०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Price Today: १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आज २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?
Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर काय? वाचा सविस्तर

तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५० रुपयांनी वाढ होऊन ते ९१,०५० रुपयांवर पोहचले आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळे सोन्यातही ५०० रुपयांनी वाढ झाली असून यासाठी तुम्हाला ९,१०,५०० रुपये खर्च करावे लागतील. तर दुसरीकडे १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७४,५०० रुपये मोजावे लागतील. तर १० तोळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७,४५,००० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Price Today: १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आज २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?
Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?

तर देशात चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज तुम्हाला १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी ११४ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी खरेदीसाठी १,१४,००० रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत आज एक किलो चांदीच्या दरात ९०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

Gold Price Today: १ तोळा सोन्याच्या दरात ५० रुपयांनी वाढ, आज २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?
Give Plastic Take Gold: काय सांगता? प्लास्टिकच्या बदल्यात सोनं! 'या' गावात सुरू आहे मालामाल करणारी ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com