Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?

Silver Price Today: सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दराने देखील चांगलाच उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात गेल्या १५ दिवसांमध्ये ८००० रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे सुवर्णनगरीत ग्राहकांची घट झाली आहे.
Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?
Gold- Silver PriceSaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्यापाठोपाठ आता चांदीने देखील भाव खाल्ला आहे. चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारत सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं- चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढ पाहता ग्राहकांची संख्या घटत चालली आहे.

जळगावच्या स्वर्ण नगरीत सोने-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सोने-चांदीने एक लाखाचा टप्पा पार केला. अमेरिकेने अनेक देशांना टेरीफ वार लावण्याबाबत इशारा दिला असून त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर झाला असल्याचे सांगितले जात आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव जीएसटी सह १ लाख ५०० रुपये आणि चांदीचे भाव जीएसटीसह १ लाख १४ हजार रुपयांवर पोहचले आहे.

Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?
Gold Price: ३ दिवसांत १५,३०० रुपयांनी महागलं सोनं, १ तोळा खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतील?

रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अनेक देशांना टेरीफ वार लावण्याबाबत इशारा दिल्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत झाला आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने एक लाख रुपयांच्या वर टप्पा गाठला असताना चांदीने ही विक्रमी दराची उंची गाठली असून १५ दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ८ हजाराने वाढ झाली आहे.

Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?
Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर काय? वाचा सविस्तर

जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर हे जीएसटीसह १ लाख ५०० तर चांदीचे दर हे १ लाख १४ हजार इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहे. वाढलेले हे सोनं-चांदीचे दर सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरचे असल्याने आजच्या दिवसात सोने आणि चांदी खरेदी करणे हे स्वप्न असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. सोनं-चांदीचे वाढते दर लक्षात घेता जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Gold- Silver Price: सोन्यापाठोपाठ चांदी चकाकली, १५ दिवसांत ८००० रुपयांनी वाढ; आजचे दर किती?
Gold Rates: खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात १,१०० रूपयांची घट; जाणून घ्या २४ अन् २२ कॅरेट सोन्याचे भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com