Gold Rates: खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात १,१०० रूपयांची घट; जाणून घ्या २४ अन् २२ कॅरेट सोन्याचे भाव

Gold Rates Fall on July 15: १५ जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून २४ कॅरेट सोनं ११ रूपयांनी स्वस्त झालं आहे. मात्र चांदीच्या दरात वाढ होत असून बाजारात हालचाल आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

सोनं आणि चांदीच्या किमतीत चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. सलग चार संत्रांमध्ये वाढ झाल्यानंतर मंगळवारी, १५ जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे अनेक ग्राहकांनी सराफा दुकानांकडे पाठ फिरवली होती. मात्र, आजची घसरण पाहता ग्राहकांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरू शकते. यामुळे येत्या काळात सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात अन्न, इंधन आणि कपडे यासह इतर वस्तूंमध्ये सोन्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. सीपीआयच्या इन्फ्लेमेशन डेटानुसार, जूनमध्ये सुरूवातीला सोन्याच्या किमतीत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. मात्र, १५ जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gold Rate Today
HIV: असुरक्षित शारीरिक संबंध, वापरलेली सुई अन्.. HIV कशामुळे होतो? सुरूवातीला दिसतील 'ही' लक्षणं

भारतात सोन्याचा दर

मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११ रूपयांनी घसरून ९,९७७ रूपये झाला आहे. १० तोळे सोन्याची किंमत १,१०० रूपयांनी घसरली, ९,९७,७०० रूपयांनी आज सराफा बाजारात व्यवहार करीत आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर १० रूपयांनी घसरून ९,१४५ रूपये प्रति ग्रॅम झाला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर ८ रूपयांनी घसरून ७,४८३ रूपये प्रति ग्रॅम झाला आहे.

Gold Rate Today
Maharashtra Politics: देवाभाऊंमुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं; शिवसेनेत बड्या नेत्यासह २००-३०० कार्यकर्त्यांचं इनकमिंग

सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदी मात्र दिवसेंदिवस महाग होत आहे. आज प्रति ग्रॅम चांदी ४ रूपयांनी वाढून ११९ रूपये झाली आहे. तर प्रति किलो चांदी ४ हजाराने वाढून १,१९,००० वर पोहोचली आहे. औद्योगिक मागणी वाढल्यामुळे गेल्या आठवड्यातही चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यातही चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com