Give Plastic Take Gold
Give Plastic Take GoldSaam TV

Give Plastic Take Gold: काय सांगता? प्लास्टिकच्या बदल्यात सोनं! 'या' गावात सुरू आहे मालामाल करणारी ऑफर

Jammu And Kashmir News: त्यावर येथील सरपंचांनी थेट प्लास्टिकच्या पिशव्या द्या आणि सोनं घ्या ही अनोखी मोहीम सुरू केली.
Published on

Jammu And Kashmir: प्लास्टिकची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अनेक व्यक्ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच कचरा भरतात. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणून देखील नागरिक सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात. अशात आता या प्लास्टिकचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी एका गावात अनोखी मोहीम राबवली जात आहे. एएनआयवर या बाबत माहिती देण्यात आलीये. (Latest Marathi News)

प्लास्टिक द्या सोनं घ्या

प्लास्टिकच्या (Plastic) पिशव्या पाण्यात गेल्यास त्याते विघटन होत नाही. यामुळे पाण्याचा निचरा देखील होत नाही. परिणामी आपल्याला या प्लास्टिकमुळे एका गावातील नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या समस्येचा सामना करावा लागत होता. नागरिकांना प्लास्टिक वापरल्याने दंड आकारुनही त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याचे प्रमाण बंद होत नव्हते. त्यावर येथील सरपंचांनी थेट प्लास्टिकच्या पिशव्या द्या आणि सोनं घ्या ही अनोखी मोहीम सुरू केली.

Give Plastic Take Gold
Cake Making Viral Video : केक बनवण्याचा डेंजर व्हिडीओ! तुम्हीच म्हणाल डिलिशिअस नव्हे तर एकदम डेंजर

कुठे आहे ही स्कीम

प्लास्टिकच्या बदल्यात सोनं (Gold) देण्याची ही स्कीम जम्मू काश्मीरच्या सादिवरा या गावात सुरु आहे. या गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांनी आपल्या गावात हा उपक्रम राबवण्यास सुरूवात केलीये. गाव प्लास्टिकमुक्त व्हावं यासाठी त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

२० क्विंटलवर १ सोन्याचे नाणे

प्लास्टिक पूर्णता बंद करण्यासाठी सरपंचांनी गावकरी आणि पंचांची बैठक घेतली त्यात त्यांनी प्लास्टिकच्या बदल्यात सोनं देण्याचं ठरवलं. यावेळी २० क्विंटल प्लास्टिकचा कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे देईल असं ठरवण्यात आलं होतं. बघता बघता या योजनेत आख्ख गाव सहभागी झालं. सादिवरा गावातील ही मोहीम पाहून अन्य गावकऱ्यांनी देखील ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com