Gold Price Outlook  Saam Tv
बिझनेस

Gold Price Outlook : दिवाळीला १० ग्रॅम सोनं खरेदी करताय? होईल ५००० रुपयांचा फायदा, कसा जाणून घ्या सविस्तर

Gold Gives 60 Percent Return : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून सध्या याचा भाव $2000 च्या आसपास आहे.

कोमल दामुद्रे

Diwali Gold Buying :

सणासुदीच्या काळात अनेकांचा कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो. त्यामुळे धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने ग्राहक सोनं खरेदी करतात. इस्त्राइस-हमास युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात सतत पडझड पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून सध्या याचा भाव $2000 च्या आसपास आहे. येत्या काळात सराफ बाजारात सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५६००० ते ५७००० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटनुसार सोन्याचा भाव ६१००० रुपयांच्या आसपास आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सोन्याच्या भावात वाढ होईल

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते, येत्या दिवाळीत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात सोन्याचा भाव ६३,००० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी असू शकतो. इस्त्राइल-हमास युद्धामुळे गुंतवणूकीदारांचा (Investment) कल वाढताना दिसून येत आहे. तसेच जगभरातील बँकांनीही त्याचे व्याजदरातही काही प्रमाणात बदल केले आहे.

आखाती देशातील युद्धामुळे सोन्याच्या (Gold) किमतीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सोन्याचा भाव ६३ हजारांचा आकडा पार करेल. भू-राजकीय, हार्ड आणि सॉफ्ट लँडिंग, मालमत्तेची खरेदी, डॉलर निर्देशांक याच्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले.

अहवालातून असे समोर आले आहे की, या वर्षात सुरुवातीला सोने जवळपास $2,070 चा उच्चांक गाठला होता. नंतर त्यात $1,800 च्या नीचांकी पातळीवर आला होता आणि आता परत $2,000 वर आला आहे.

2. सोन्यावर ६०% चा परतावा मिळेल

सणासुदीच्या काळात सराफ बाजारात (Market) सोन्याला अधिक मागणी असते. अलीकडे मागणीच्या ट्रेंडमध्ये तीव्र बदल होताना दिसून येत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. जर ४ वर्षापूर्वी अर्थात २०१९ मध्ये सोन्यात गुंतवणूक केली असेल तर या दिवाळीपर्यंत तुम्हाला ६० टक्क्यांचा परतावा मिळेल. ५ आणि १ वर्षाच्या कालावधीत एसपीडीआर गोल्ड शेअर्समध्ये १० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना येत्या काही दिवसात सोन्यात गुंतवणूक केली असल्यास अधिक नफा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT