HDFC Bank Interest Rate Hike : ग्राहकांना झटका! कर्जाचा बोझा वाढणार, एचडीएफसीने व्याजदरात केली वाढ

HDFC Bank Rate Hike : HDFC ने मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.
HDFC Bank
HDFC BankSaam TV
Published On

HDFC Bank Hike MCLR :

ऐन सणासुदीच्या काळात देशातील सगळ्यात मोठी आणि खासगी बँक HDFC ने ग्राहकांना पुन्हा एकादा झटका दिला आहे. HDFC ने निवडक कर्ज कालावधीसाठी कर्जदरात 0.05 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात बँकेने कर्जात वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. बँकेने सांगितले की, एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीन झाल्यानंतर निव्वळ व्याज मार्जिनमध्ये घट झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. नवे व्याजदर किती आहे?

MCLR चा सध्याचा 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्के करण्यात आला आहे. तर नवीन तीन वर्षांचा MCLR सध्याच्या 9.25 टक्क्यांच्या तुलनेत 9.30 टक्के असेल. यावेळी बँकेने (Bank) एक वर्षाच्या MCLR वर व्याजदर ठेवला आहे. ज्यामध्ये गृहकर्जासह इतर अनेक कर्ज (Loan) जोडण्यात आली आहे. सध्या व्याजदर हा ९.२० टक्के इतका आहे.

HDFC Bank
Share Market Trading Muhurta : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे कमावण्याची संधी; शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग कधी?

2. MCLR दर किती आहे?

MCLR हा किमान व्याजदर आहे. ज्याच्या खाली बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही. प्रत्येक बँकेला विविध कालावधीनुसार त्यांचा MCLR दर घोषित करावा लागतो. यामध्ये एका दिवस, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष इत्यादी कालावधीचा समावेश असतो. मंगळवारी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 4.50 रुपये किंवा 0.30 टक्क्यांनी घसरून 1,490 रुपयांवर बंद झाले. त्यामुळे ग्राहकांना अधिकचा EMI भरावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com