Investment Tips : केवळ 20 हजाराचा पगार खर्च करुन गुंतवणुक आणि बचत करायचीय? बघा ही सोपी पद्धत

Strategies Of Saving Money : आर्थिक नियम असे सांगतो की, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करावी आणि प्रत्येक परिस्थितीत गुंतवणूक करावी.
Investment Tips
Investment Tips Saam Tv

Utility New :

साधारणपणे गुंतवणूक हा शब्द ऐकल्यावर असे वाटते की लाखो रुपये खर्च करायला सांगितले जात आहेत. पण तुम्ही 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. आर्थिक नियम असे सांगतो की, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करावी आणि प्रत्येक परिस्थितीत गुंतवणूक करावी. पण ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांचा सहसा असा युक्तिवाद होतो की एवढ्या कमी पगारात आपण काय गुंतवायचे आणि थोडी जरी गुंतवणूक (Investment) केली तरी त्यात किती भर पडेल.

तुम्ही दरमहा 20,000 रुपये कमावले तरीही 20 टक्के नियमानुसार तुम्ही दरमहा 4,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि 1 कोटींहून अधिक रक्कम बचत (Savings) करू शकता. 20,000 रुपयांच्या पगारात 4,000 रुपये वाचवण्यासाठी तुम्हाला तुमचा खर्च नक्कीच कमी करावा लागेल, परंतु याद्वारे तुम्ही तुमचे भविष्य सहज सुरक्षित करू शकता. जाणून घ्या कसे -

Investment Tips
Investment Tips : फक्त बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी हे अनेक पर्याय फायदेशीर, जाणून घ्या

SIP 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करेल

आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी SIP हे गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. मार्केट लिंक्ड असूनही, SIP हे गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केली जाते. गेल्या काही वर्षांत, एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्क्यांपर्यंत परतावा दिसला आहे. चक्रवाढ व्याजाचा लाभ एसआयपीमध्ये उपलब्ध आहे. एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही सुमारे 30 वर्षांसाठी SIP मध्ये दरमहा 4,000 रुपये गुंतवल्यास, 30 वर्षांत तुम्ही एकूण 14,40,000 रुपये गुंतवाल आणि तुम्हाला 12 टक्के दराने 1,26,79,655 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,41,19,655 रुपये मिळतील.

Investment Tips
Best Investment In IPOs : नवरात्रौत्सवात कमाईची मोठी संधी! पुढील आठवड्यात या 3 IPO मध्ये गुंतवा पैसे अन् व्हा मालामाल

जर तुम्ही 25 वर्षे दरमहा 4,000 रुपये गुंतवले तर 12 टक्के दराने तुम्हाला 75,90,540 रुपये मिळू शकतात. ही गणना सरासरी परताव्याची आहे, जर तुम्हाला यापेक्षा चांगला परतावा मिळाला तर तुम्हाला आणखी नफा मिळू शकेल. SIP ची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार कधीही त्यात तुमची गुंतवणूक वाढवू शकता. गुंतवणूक जितकी चांगली आणि ती जितकी जास्त असेल तितका चांगला फायदा तुम्हाला मिळू शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com