कोमल दामुद्रे
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही फिरण्याचा प्लान करत असाल तर मुंबई जवळील या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.
मुंबईजवळ असलेली काही प्रसिद्ध हिल स्टेशनबद्दल जाणून घेऊया
पुणे-मुंबईच्या जवळ असलेल्या पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगेत असलेले लोणावळा महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर हिल स्टेशन.
या ठिकाणी अनेक धबधबे, तलाव, सुंदर टेकड्या पाहायला मिळतील. येथे कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करता येते.
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाण खंडाळा.
खंडाळा हे सुंदर दऱ्या, हिरव्यागार टेकड्या, शांत तलाव, धुके आणि धबधब्यांसाठी अंत्यत लोकप्रिय ठिकाण आहे.
ऐतिहासिक ठिकाण म्हणून पन्हाळा हिल स्टेशन. अनेक ट्रेकर्सप्रेमी येथे ट्रेकिंगसाठी जातात.
पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये वसलेले निसर्गसंपन्न ठिकाण माळेशाज घाट. अनेक वळणदार रस्ते आणि टेकड्यांवरुन कोसळणारे अरुंद धबधबे पाहायला मिळाला.