कोमल दामुद्रे
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात असे अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात.
डोंगरदऱ्या, निसर्गाचे नयनरम्य दृश्य ट्रेकर्सप्रेमींचे आकर्षणाचे ठिकाणं बनले आहे.
त्यातील एक ठाण्यातील भैरवगड. जो आजही अनेकांना भुरळ घालतो.
बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला.
मोरोशीचा भैरवगड, माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगांपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे.
एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट.
ट्रेकिंगसाठी हा अत्यंत कठीण किल्ला मानला जातो. भैरवगड किल्ला हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसतो.