Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ३३,८०० रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे आज खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते वाचा...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३३,८०० रुपयांनी घट झाली आहे. तर एक किलो चांदीचे दर २००० रुपयांनी कमी झाले आहेत. आज तरुणांना पाडव्यानिमित्त बायकोलो सोनं गिफ्ट देण्याची सुवर्णसंधी आहे. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे दर किती ते एकदा वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर ३,३८० रुपयांनी कमी आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२७,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३,८०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७२,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,१०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१६,६०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३१,००० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,६६,००० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं काल ११,९७,००० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,५४० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९५,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २५,४०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,५४,००० रुपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांचा कल वाढला आहे. तसंच सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घट झाली आहेत. १ ग्रॅम चांदीचे दर ४२ रुपयांनी कमी झाले आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १६२ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी घट झाली आहे. आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,६२,००० रुपये मोजावे लागतील. दर कमी झाल्यामुळे आज तुम्ही चांदी देखील खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT