
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ३३,३०० रुपयांची वाढ झाली
२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ
चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. प्रति किलो चांदीत ४,००० रुपयांची घट
सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यापेक्षा चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३३,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे दर किती ते एकदा जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,३३० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोनं खरेदीसाठी १,३२,७७० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३,३०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,२७,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२१,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३०,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१७,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. हेच सोनं काल १२,१७,००० रुपयांना विकले गेले.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९९,५८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,९५,८०० रुपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरी देखील चांदीचे दर मात्र घसरले आहेत. १ ग्रॅम चांदीचे दर ४ रुपयांनी कमी झाले आहेत. ही चांदी खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १८५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ४००० रुपयांनी घट झाली आहे. आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,८५,००० रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.