

जळगावच्या बाजारात सोन्या पाठोपाठ चांदी दरही विक्रमी पातळीवर.
मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याने होतेय दरामध्ये मोठी वाढ.
ट्रम्प यांचे टेरिफ धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कमी झाल्याचा परिणाम.
संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी
जळगाव : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. आठवड्याच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये २५ हजार रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे.
मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे दरवाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदार कमी झाल्याचा चांदीच्या दरात परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे १ लाख ८५ हजार आहेत, सोन्याचे भाव (जीएसटीसह) १ लाख २८ हजार रुपयांवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये ही मोठी भाव वाढ झाली असून बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८५,००० वर जाऊन पोहोचले आहे आठ दिवसांमध्ये चांदीत २५ हजार रुपयाची मोठी भाव वाढ झाली असून दिवसेंदिवस चांदी ही वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे.
इंडस्ट्रियल झोनमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने देखील चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. सातत्याने चांदीचे भाव वाढ होत असल्याने आता चांदी घेताना देखील आठ दिवसाची मुदत घ्यावी लागत आहे. मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे देखील मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.