
एका चहावाल्याच्या घरात पोलिसांना पैशांचे घबाड सापडले आहे. चहावाल्याच्या घरात एक कोटीच्या रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिने साडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी एक कोटीपेक्षा अधिकच्या रोकडसह ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी जप्त केल्या आहेत. एका चहावाल्याकडे इतकी रक्कम पाहून सर्व आवाक झालेत. चहावाल्याने इतका पैसा कसा कमावला? याचा तपास जेव्हा पोलिसांनी केला त्यावेळी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.
अभिषेक कुमार नावाचा व्यक्ती आधी चहाचं दुकान चालवायचा. काही काळानंतर तो दुबईला गेला. तिथून तो सायबर चोरीचे नेटवर्क चालवू लागला. या कामात त्याचा भाऊ आदित्य कुमार मदत करत होता. ही टोळी सायबर चोरीच्या माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये पैसे मागायची आणि त्यानंतर रोख रकमेत व्यवहार करात, असायची अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आलीय. या टोळीत बरेच जण सहभागी असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही सख्ख्या भावांना अटक केली आहे.
सायबर डीएसपी अवंतिका दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गोपनीय सुचनेच्या आधारे १७ ऑक्टोबरला गोपालगंजमधील एका घरावर छापा टाकला. या घरातून १ कोटी ५ लाख ४९ हजार ८५० रुपयांची रोकड, ३४४ ग्रॅम सोनं, १.७५ किलो चांदी हस्तगत केली. पोलिसांनी आरोपींकडून ८५ एटीएम कार्ड, ७५ बँक पासबुक, २८ चेकबुक, २ लॅपटॉप, ३ मोबाईल आणि लक्झरी कारदेखील जप्त केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.