Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

Woman Falls in Love with Nephew : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम जडलं. पण त्याने लग्नाला नकार दिल्याने तिने पोलीस ठाण्यातच स्वतःचा हाताची नस कापून घेतली.
Woman Falls in Love with Nephew
Shocking crime in Sitapur: Woman slits wrist inside police station after nephew refuses marriage proposal.Saam TV
Published On
Summary
  • सीतापूरमध्ये एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • मामीचं तिच्या १५ वर्षांनी लहान भाच्यावर प्रेम जडलं होतं.

  • भाच्यानं लग्नास नकार दिल्यानं मामीने पोलिसांसमोरच हाताची नस कापली.

भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीनं पोलीस स्टेशनमध्येच हाताची नस कापली. ही घटना घडली आहे, उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. प्रेमी भाच्यासोबत वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. त्याचवेळी प्रेमात वेडी झालेल्या मामीने हातची नस कापून घेतली.

मामीने असा टोकाचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे भाच्यानं प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. मामीने त्याला लग्नाची मागणी घातली होती, पण भाच्याने नकार दिल्यानं मामीनं पोलिसांसमोरच नस कापून घेतली. ही संपूर्ण घटना पिसावा पोलीस स्टेशन परिसरात घडली. या महिलेवर लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मामीला आधीच दोन मुले आहेत.

Woman Falls in Love with Nephew
Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

पूजा मिश्रा असे या महिलेचे नाव असून ती कुतुबनगर येथील रहिवासी आहे. तर भाच्याचे नाव अलोक आहे. दरम्यान पूजाचे लग्न गाझियाबादमध्ये राहणाऱ्या ललित मिश्रासोबत झाले आहे. ललित मिश्रा हा मजूर म्हणून काम करतो. ललितने आलोकला त्याच्या कामात मदत करण्यासाठी बोलावले होते. ललित आणि पूजाला दोन मुले आहेत. दरम्यान आलोकचे त्याच्या मामीशी सूत जुळलं.

Woman Falls in Love with Nephew
Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

जेव्हा ललितला त्याची पत्नी आणि भाच्याच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्याने आलोकला घरातून हाकलून लावले. त्यानंतर पूजा तिच्या मुलांना सोडून आलोकसोबत बरेलीला राहायला गेली. तेथे ते सुमारे सात महिने एकत्र राहिले. आलोक बरेलीमध्ये ऑटो चालवायचा.

काही महिने दोघांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध होते, पण नंतर क्षुल्लक गोष्टींवरून त्यांच्यात वाद होऊ लागले. वादामुळे आलोक पूजाला सोडून सीतापूरच्या पिसावा भागातील त्याच्या मूळ गावी, मढिया येथे परतला. आलोक तिला सोडून जाण्यास इच्छित असल्याचं कळल्यानंतर पूजादेखील सीतापूरला परतली.

दरम्यान हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांनी आलोक आणि पूजाला पोलीस ठाण्यात बोलावले होते. तडजोडीची चर्चा सुरू असतानाच आलोकने पूजाला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्यानंतर पूजाने पोलिस स्टेशनमध्येच आपले मनगट कापले. या चिरामुळे स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com