
सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे.
आरटीआयच्या माहितीतून १६४ कोटींचा मोठा घोटाळा उघड झालाय.
लाडकी बहीण योजनेत तब्बल १२ हजार पुरुषांनी लाभ घेतलाय.
महायुती सरकारची महत्त्वकांक्षी आणि सत्ता मिळवून देणारी योजनेत मोठा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे. हो आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतच बोलत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याच समोर आले आहे. तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला. दरम्यान सरकारची लाडकी बहीण योजनेतून लाभार्थ्यांना १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
दरम्यान योजनेचा लाभ १२ हजार पुरुषांनी घेतल्याची माहिती आरटीआयच्या माहितीतून ही बाब घडकीस आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून गेल्या वर्षभरात हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याच समोर आले आहे. या १२ हजार पुरुषांनी १३ महिने या योजनेचा लाभ घेतला असून या पुरुषांनी दर महिना १५०० रूपये घेतले आहेत.
७७ हजार अपात्र महिलांना १२ महिन्यापर्यंत ही रक्कम मिळाली असल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २०० कोटी बजेट घोषित करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी या योजनेवरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होतं.
दरम्यान गैरव्यवहार उघडकीस आल्याच्या वृत्ताला महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी केली आहे. या गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीला २५ कोटींचा फटका बसला आहे. दरम्यान हे योजनेतील गैरव्यवहाराचे हिमनगाचे टोक आहे. म्हणजेच यात मोठा गैरव्यवहार झाल्याचं म्हटले जात आहे. लाडक्या भाऊंकडून अद्याप वसुली करण्यात आलेले नाहीये.
तर या योजनेतील निकषांना डावलून २४०० सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा चुकीचा लाभ घेतलाय. यात पुरुषही सहभागी आहेत. सरकारने अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसूली केलेली नाही. दरम्यान सुरुवातीच्या तपासात २६ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या होत्या. आतापर्यंत २६.३४ लाख संशयित खाते योजनेच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. पडताळणी जसजशी होईल, तसा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.