भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशमधील लोकांसाठी गूड न्यूज दिली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन उत्तर प्रदेशातून सुरू होणार आहे. पहिल्या वंदे भारत स्लीपरचा मार्ग देखील निश्चित झाला आहे. या ट्रेनचं शेड्युल जून महिन्यात जारी होणार आहे. ही ट्रेन लखनऊ ते मुंबई अशी चालवली जाणार आहे. याआधी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन वाराणसी ते दिल्लीदरम्यान सुरू करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कोचिंग यार्डात नव्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा रॅक पोहोचला आहे. प्रशासन या ट्रेनच्या ट्रायलचा विचार करत आहे. खरंतर लखनऊ ते मुंबई मार्गावर सर्वाधिक रेल्वे प्रवासी आहेत. त्यामुळे रेल्वेने या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचा विचार केला. रेल्वेने या मार्गाचा सर्व्हे देखील केला आहे. तेजस एक्स्प्रेससारखी ही ट्रेनही आठवड्यात चार दिवस चालवण्याची योजना आखली जात आहे. यासाठी फक्त रेल्वे बोर्डाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहिली जात आहे. बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर या ट्रेनचा मार्ग आणि वेळापत्रक जारी केले जाईल. जुलै महिन्यात या ट्रेनच्या ट्रायलची शक्यता आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून या मार्गाचा सर्व्हे सुरु होता. सुरुवातीला कानपूर, मथुरा, आग्रा मार्गाने मुंबईला जाण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर बरेलीहून आंवला, चंदौसी, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन मार्गाने आग्रा आणि त्यानंतर मुंबईला जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला. तोही बदलला. शेवटी लखनऊहून हरदोई, शाहजहांपूर, बरेली जंक्शन, रामपूर, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन, आग्रा या मार्गाने मुंबईला जाणारा मार्ग ठरला. या ट्रेनमुळे उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांतील लोकांचा मुंबई प्रवास सुलभ होणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण २० कोच असतील. यामध्ये एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लास व्यतिरिक्त दोन एसएलआर कोचही असतील. या ट्रेनची १२०० प्रवाशांची क्षमता असेल. या ट्रेनमुळे लखनऊ-मुंबईचा प्रवास १० तासांत पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.