Central Railway: प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या! लोकल रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; २० मिनिटे उशिराने मध्य रेल्वेची वाहतूक

Mumbai Central Railway: मुंबईतील सेंट्रल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावं लागत आहे.
Mumbai  Local Train
Mumbai Central Railwaysaamtv
Published On

हवामान विभागाने मुंबईसह उपनगरात पावसाचा अंदाज वतर्वलाय. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. मुंबईतील सेंट्रल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावं लागत आहे. लोकलला येण्यास वेळ येत असल्यानं रेल्वे स्थानकांवर गर्दी जमलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुबंईसह उपनगरात पाऊस सुरू झालाय. ठाण्यात पावसाला सुरुवात झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून २० मिनिटे उशिराने रेल्वे वाहतूक होत आहे.

Mumbai  Local Train
Monsoon Updates: राज्यात उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, आज मात्र महाराष्ट्राला हवामान खात्याचा अलर्ट

सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. आकाशात संपूर्ण काळोख साचला होता. त्यानंतर आता पावसाला सुरुवात झालीय. पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेचं वेळापत्रक विस्कळीत झालंय. ट्रेन उशिराने येत असल्यानं स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे.

हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मान्सूनच्या पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. आज सकाळपासून पावसाने जरी काहिशी विश्रांती घेतली होती,परंतु दुपारपासून पाऊस सुरू झालाय. आता मुंबईकरांसाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिलाय.

Mumbai  Local Train
Maharashtra Weather: कोकणासह विदर्भाला पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. मागील २४ तासातील हा दुसरा पावसाचा रेड अलर्ट आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आज सकाळी पावसाने उसंत घेतली होती. परंतु दुपारपासून पुन्हा एकादा पडण्यास सुरुवात झालीय.

पावसामुळे मुंबईकरांची लाफलाईनवर मोठा परिणाम झाला. रविवारी झालेल्या पावसामुळे रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. आज परत एकदा मध्य रेल्वे सेवा कोलमडली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com