FAStag Annual Pass Saam Tv
बिझनेस

FASTag Pass: ३००० रुपयांचा फास्टॅग पास, वर्षभर करता येणार मोफत प्रवास; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना होणार फायदा

FASTag Annual Pass: वाहनधारकांसाठी फास्टॅग वार्षिक पास देण्यात आला आहे. या पासमुळे महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना फायदा होणार आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता फास्टॅग पास सुरु झाला आहे.आता तुम्हाला वर्षाला फक्त ३००० रुपयांचा फास्टॅग पास काढायचा आहे. यामुळे तुम्हाला वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. टोल प्लाझावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. आजपासून हा फास्टॅग पास सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता या पासमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरांना फायदा होणार आहे.

या तिन्ही जिल्ह्यांना फायदा होणार आहे (FASTag Pass Benefit For Satara, Sangli, Kolhapur)

हा फास्टॅग पास तुम्ही सरसकट सर्व टोल प्लाझावर वापरु शकत नाही. तुम्हाला फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर पास वापरता येणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा फायदा कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना होणार आहे. या मार्गातील टोल प्लाझावर तुम्हाला टोल भरावा लागणार नाहीये. असं जरी असले तरीही या पासचा फायदा पर्यटनासाठी किंवा कामासाठी बाहेर जाणाऱ्यांना विशेष फायदा होणार आहे.असे जरी असले तरीही वर्षभरात २०० फेऱ्या होणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

किंमत किती आणि कुठे उपलब्ध होणार पास?

वार्षिक फास्टॅग पासची किंमत ३००० रुपये असणार आहे. तुम्ही ज्या तारखेपासून हा फास्टॅग पास खरेदी करणार त्यानंतर वर्षभर वापरता येणार आहे किंवा २०० ट्रीपसाठी वापरता येणार आहे. जी खाजगी वाहने सुट्टी किंवा सणांच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यात जातात त्यांना हा पास लागू होणार नाही. हा पास कार, जीप, व्हॅन या वाहनांना वापरता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

राष्ट्रीय महामार्गांसाठी ३,००० रुपयांमध्ये वार्षिक फास्टॅग पास सुरू; पास कसा मिळवायचा पाहा VIDEO

Pranjal Khewalkar : महिलेचे चोरून फोटो, व्हिडिओ काढले; खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर आणखी गोत्यात

Onion Uttapam: नाश्त्याला झटपट बनवा उत्तप्पा; सर्वच आवडीने खातील

SCROLL FOR NEXT