
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १५ ऑगस्ट २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे. या टोल पासची किंमत ३,००० इतकी असून, वापरकर्त्यांना यासाठी प्री-बुकिंग करावी लागणार आहे. बुकिंग प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात याबाबत अंतिम अंमलबजावणी केली जाईल.
मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) याबाबत सल्ला दिला आहे. या नव्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ३० जूनपर्यंत देशभरातील ११९ टोल नाक्यांवर यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वार्षिक टोल पासची वैशिष्ट्ये
पासची किंमत: ३,०००
वैधता: १ वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० ट्रिप्स, जे आधी पूर्ण होईल
सुरुवात: १५ ऑगस्ट २०२५
कोण अर्ज करू शकतो?
हा वार्षिक पास फक्त कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या गैर व्यावसायिक खासगी वाहनांसाठी आहे. सर्व फास्टॅग वापरकर्ते खरेदी करू शकणार नाहीत. यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
वाहनाच्या विंडशील्डवर सक्रिय फास्टॅग बसवलेला असावा
फास्टॅग वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी योग्य प्रकारे जोडलेला असावा
ज्या फास्टॅग युजर्सचा फास्टॅग अजूनही तात्पुरत्या क्रमांकाशी लिंक आहे, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी तो अपडेट करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना
१५ ऑगस्टपासून हा टोल पास फक्त अधिकृत सरकारी अॅप किंवा वेबसाइटवरूनच खरेदी करता येणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत अॅप्स आणि संकेतस्थळांपासून सावध राहा. तसेच अधिकृत संकेतस्थाळावरून माहिती घेत राहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.