

मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकाने मेल–एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांमध्ये ९.६३ लाख विनातिकीट/अवैध तिकीटासह/ बुकिंग न केलेल्या सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले व ४०.५९ कोटी रुपये दंड वसूल केला.
वातानुकुलीत लोकल तिकीट तपासणी पथक दररोज सुमारे ३६८ विनातिकीट/अवैध तिकीटधारक प्रवाशांवर कारवाई करून सरासरी रु.१.१९ लाख दंडाची वसुली करते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील बैठकीला आमदार धनंजय मुंडे गायब .
बीडमधील हा दुसरा कार्यक्रम आहे, धनंजय मुंडे गैरहजर आहेत.
अजित पवारांच्या बीडमधील बैठकीला धनंजय मुंडे यांची गैरहजेरी.
बीड नगर परिषदेच्या अनुषंगाने बीडमध्ये व्यापाऱ्यांची बैठक मात्र धनंजय मुंडे सकाळपासून अजित पवारांसोबत नाहीत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बीडमध्ये नाराजी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूर येथे दाखल..
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा..
एकनाथ शिंदेचे जल्लोषात स्वागत ...
श्रीरामपूरमध्ये भाजप आणी शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकलीय..
एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष...
श्रीरामपूर येथे आघाडीतील काॅग्रेस आणी शिवसेना उबाठाही आमने सामने..
श्रीरामपूर नगरपालीका निवडणूकीत चौरंगी लढत...
"पोरावरची केस मागे घे आणि ५ लाख दे..." निलेश घायवळची धमकी
खंडणी मागितल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल
पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
घायवळवर ११ वा गुन्हा दाखल
निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि टोळीतील इतर सदस्यांवर गुन्हा दाखल
पुण्यातील एका व्यावसायिकाला डोक्याला पिस्तूल लावून दिली होती धमकी
धाराशिव बस डेपो मध्ये तीन तास डिझेल नसल्याने एसटी बस सेवा बंद झाली आहे.
तीन तास शाळेतील विद्यार्थी आणि प्रवाशी होते बस स्थानकावर ताटकळत
अखेर तीन तासानंतर बससेवा झाली सुरळीत
पालकमंत्री प्रताप सर नाईक यांनी दोन दिवसापूर्वी धाराशिव बस डेपोला दिली होती,भेट देत गैरसोईमुळे अधिकाऱ्यांना दिली होती ताकीत
तीन तासानंतर बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मिळाला दिलासा
तूम्ही मला साथ द्या , मी तुम्हाला साथ देतो.तूम्ही मला सहकार्य करा , मी तुम्हाला सहकार्य करतो.आता मीडियावाले म्हणतील अजिद दादांनी प्रलोभने दाखवली.मी बोलनारच , मी साधू संत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नांदेड जिल्हयातील कंधार येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.त्यांच्या अश्याच एका वक्तव्यावरून टीका झाली होती. त्यानंतर अजिद दादांनी आज हे वक्तव्य केलं. तुम्हाला विकास पाहिजे.मी विकास करु शकतो , मी तुम्हाला मदत करू शकतो असं अजित पवार म्हणाले.
देवळीत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस लढत आहे अध्यक्षपदाची निवडणूक
लोकसभा उमेदवार निवडताना चूक झाली पालकमंत्री पंकज भोयर यांचा खासदार अमर काळे यांना टोला
लोकसभेत ज्याला निवडून दिलं तो व्यक्ती दिसला का कधी
पालकमंत्री पंकज भोयर यांची नाव न घेता खासदार अमर काळेंवर जोरदार टीका
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा...
आज सायंकाळी सभेचे आयोजन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट..
सभा स्थळाकडे जाणा-या शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी...
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे मोठे खड्डे बुजवले...
नगर - मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठा पुल देखील वाहतुकीसाठी केला खुला...
शिर्डी विमानतळ ते कोपरगाव, मुख्यमंत्री करणार वाहनाने प्रवास...
बारामतीत काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने युवा नेते युगेंद्र पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आपल्या विरोधात उभे असणारे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 20 20 लाख रुपये दिले असल्याचा आरोप केला होता.
या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये युगेंद्र पवार यांनी केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात 1168मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता इंदिरानगर नाका येथे 750मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक आहे. परिणामी बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार दिनांक 27/11/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर आज पुन्हा एकदा आले एकत्र
भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आज दानवे आणि लोणीकर एकाच मंचावर
लोणीकर भोकरदन मध्ये येताच रावसाहेब दानवे यांनी घेतली गळाभेट,तर दोघांमध्ये मंचावर काही काळ हास्य कल्लोळ
परवा दिवशी परतुर मध्ये रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ तर आज भोकरदन मध्ये लोणीकरांच्या हस्ते प्रचाराचा फुटला नारळ
रत्नागिरी - चिपळूण खेर्डी MIDC मधील थ्री एम पेपर मिल कंपनीला भीषण आग
अचानक लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले.
मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्याने आगीची व्याप्ती वाढली.
मागील अर्ध्या तासांपेक्षा जास्त काळ आग सुरू.....
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक...
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा दिलासा...
विरोधकांची आक्षेप याचिका कोर्टाने फेटाळली...
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या 29 उमेदवारांवर नोंदवण्यात आला होता आक्षेप...
प्रतिज्ञापत्राच्या शेवटच्या पानावर सही नसल्याचा आक्षेप घेत भाजपने घेतली हाती कोर्टात धाव...
कोर्टाने आक्षेप याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा दिलासा...
भाजप उच्च न्यायालयात जाणार का? याकडे लक्ष...
मात्र कोपरगाव न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा...
कोपरगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत...
राष्ट्रवादीचे काळे आणि भाजपचे कोल्हे घराण्याची प्रतिष्ठा पणाला..
घाटकोपर पूर्वे कडील 90 फिट रोड वरील साई नगर मध्ये असलेल्या इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर आग
प्राथमिक अदाजानुसार शॉट सर्किट मुळे लागली आग
आगी मध्ये सहा जण जखमी जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल
जखमी मध्ये महिलांचा समावेश
अमरावती -
भूकंप सदृश्य धक्क्याने शिवणगाव गाव हादरले
खासदार बळवंत वानखडे सह प्रशासनाची गावात भेट
शिवणगाव गावात ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
कोल्हापूर -
कोल्हापुरात गर्भलिंग निदान संदर्भात मोठी कारवाई
करवीर तालुक्यातील बालिंगा इथं अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा
कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा संयुक्त छापा
छाप्यात गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि औषध-गोळ्या जप्त केल्याची प्राथमिक माहिती
कोल्हापूर पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून बालिंगा पंचनामा सुरू
संशयित डॉक्टर फरार तर एजंटांची नावे आणि समोर
नवीन मुल्ला जास्त प्रार्थना करतो
नाना पटोले यांनी लगावला नवनीत राणा यांना टोला
हिंदू विरुद्ध मुस्लिमान केल्याने लोकांना अन्न मिळतो काय?
भाजप अज्ञानी आहे
नंदुरबार -
शहादा जनता चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा...
अवघ्या काही वेळात मुख्यमंत्री सभा स्थळी दाखल होणार...
शहादा पालिकेतील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस शहादा दौऱ्यावर...
पुणे -
पुणे पीएमपीला आता अग्निसुरक्षा
पीएमपीएमएलमधील सर्व बसचे फायर ऑडिट करण्यात येणार
पीएमपीएमएलच्या ताफ्यात 2हजार 19 बस आहेत.यामध्ये स्वमालकीच्या 735 तर ठेकेदारामार्फत 1 हजार 283 बस चालवल्या जातात
पुणे -
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, राजस्थान रॉयल्स संघाचे सामने पुण्यात होण्याची शक्यता
आय पी एल मधील राजस्थान रॉयल्स संघाकडून पुण्यातील स्टेडियम ची चाचपणी
राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एम सी ए) शी संपर्क
‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी
चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली
वंचित बहुजन आघाडीकडून 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन
2023 मध्ये सुद्धा घेतली होती महासभा
24 मध्ये महासभा होणार होती पण विधानसभा निवडणुकीमुळे घेता आली नाही
दरवर्षी 25 नोव्हेंबरला संविधान महासभा हे घेत राहणार आहोत
सुजात आंबेडकर यांची माहिती
पुण्यातील औंध मधील सिंध सोसायटी परिसरात आढळून आलेला बिबट्या हा पुन्हा जंगल आणि नदी परिसरात निघून गेल्याच वन विभागाने सांगितले आहे. बिबट्या आढळून आल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सर्च ऑपरेशन सध्या सुरू नाही मात्र वनविभागाकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी दिली आहे
एअरपोर्ट प्रशासनाने तक्रार केल्यानंतर आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात जाऊन पाहणी केली. मे महिन्यात आढळून आलेला बिबट्या तो पुन्हा एकदा दिसून आला. १९ नोव्हेंबर रोजी बिबट्या रन वे वर दिसून आला अशी माहिती आम्हाला विमानतळ प्रशासनाने दिली होती मात्र त्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही मात्र धोका असल्याचं स्पष्टीकरण वन विभागाकडून देण्यात आलं आहे. त्याला पकडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ज्या ठिकाणी एक पिंजरा उभारण्यात आला होता तो पिंजरा त्याच परिसरात थोड्या दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आला आहे.
कोल्हापुरात ई बाइक्स दुरुस्त करून दिल्या जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक
चारच दिवसांपूर्वी साम टीव्ही ने इलेक्ट्रिक बाइक्स सर्विस चा बोजवारा ही बातमी केल्याने मनसे आक्रमक
उद्यम नगर परिसरातील ओला कंपनीच्या कार्यालयाच्या दारात मनसेचा आंदोलन
त्वरित बाईक दुरुस्त करून दिल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओला कंपनीला इशारा
मुंबई-गोवा महामार्गावर रायगडजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. बस ओढ्यात कोसळली. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत.
डोंगराळे येथील चिमुकलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी विचारला आहे
चिमुकलेचा बॅनर हातात धरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आणि पिंपळनेर येथील सभास्थळी हा जाब आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्यातील पहिली सभा धुळ्याच्या पिंपळनेर येथे पार पडली आणि या सभेच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आहे
दक्षिण सोलापूर तालुक्यात एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना
नाशिकच्या येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ समीर भुजबळ यांच्या हस्ते फुटला. गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, आरपीआय आणि इतर मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शहरातून उमेदवाराची यावेळी रॅली काढण्यात येऊन खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात झाली आहे,यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर महायुतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला.
काही जणं कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने बनावट फोटो तयार करून समाजात अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आलं आहे.
अशा प्रकारे खोटी व दिशाभूल करणारी माहिती, फोटो किंवा मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवू नयेत, वन विभागाचे आवाहन
त्यांच्यावर विद्यमान शासकीय नियमावली व कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, वन विभागाची माहिती.
झिंगाबाई टाकळी बंधू नगर परिसरातील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती...
मंडप डेकोरेशनचे साहित्य कापड आणि बाबू यासारख्या ज्वलनशील वस्तूमध्ये आग भडका उडाला
अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी रवाना
नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची भुसावळमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे...
भुसावळ येथील भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जात असून पाहणी करण्यात आली आहे.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यातील पहिलीच सभा आहे...
नगरपरिषद निवडणुका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीने तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार...
अनंत गर्जे यांना अटक करावी अशी होती माहेरकडच्या लोकांची मागणी...
पोलिसांकडून अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती दिल्यानंतर डॉ.गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार....
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा
पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा...
नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पहिली प्रचारसभा...
उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष...
सर्वाधिक हरकती हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे
हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे ५२ हरकती
ढोले पाटील रोड, वारजे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात एक ही हरकत ची नोंद नाही
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाग व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली
निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ इतकी आहे
प्रारूप मतदार यादींवर हरकती नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत
न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. ते देशाचे ५३ वे सरन्यायाधीश झाले आहेत.
- गावातून बिबट्या आणि त्याचे पिल्लू पळत असल्याची दृश्य मोबाईल कॅमेरात कैद
- काल सायंकाळी दत्तू म्हैसधूणे यांच्या शेतात एक बिबट्या मृत अवस्थेतही आढळल्याने खळबळ
- परिसरात दोन ते तिन बिबटे असल्याची चर्चा, गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
- गावात वनविभागाकडून लावण्यात आला पिंजरा, रात्री ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असून बिबट्याचे शोधकार्य सुरू
- सोलापूर शहर आणि परिसरात मोटरसायकलची चोरी करणाऱ्या चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
- चोरट्याकडून तब्बल सहा मोटरसायकल असा चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त
- एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करणारा तरुण निघाला चोर
- सदर चोरट्याने सोलापूर आणखी काय काय कारस्थान केली आहेत याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत
पुण्यात दाट धुक्याची चादर
पुण्यातील शिवणे,उत्तमनगर भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुक
थंडीचा कडाका काहीसा की झाला आहे मात्र धुके मोठ्या प्रमाणात वाढले आहे
बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत यामध्ये आती संवेदनशील आणि महत्त्वाची नगरपरिषद म्हणजे परळी नगर परिषद मुंडे बहीण भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्र असून लोकसभेला आणि विधानसभेला परळी मध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडला होता व्हिडिओ समोर आले होते मात्र तो प्रकार पुन्हा घडू नये सीसीटीव्ही फुटेज बंदोबस्त वाढवण्यात यावा यासाठी शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या देशमुख यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली असून पत्र व्यवहार केला आहे चुकीचे प्रकार घडवून देऊ नका नसता येणाऱ्या काळात परिणामाला सामोरे जावे लागेल आणि याचा सर्वस्वी जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असेल अशी प्रतिक्रिया संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना भाजप मधील वाद सर्वश्रुत आहे. नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील दोन्ही घटक पक्षातील वाकयुद्ध चांगलंच रंगलंय. अलिबाग नगर पालिकेत आमदार महेंद्र दळवी यांना उमेदवार मिळाला नाही त्यांनी शेकापशी हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलाय. शेकापचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणारे त्यांच्याशीच सेटलमेंट करीत आहेत आहेत, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. रोह्यात देखील त्यांना उमेदवार नाहीत. आमच्याकडून उमेदवार पळवावे लागले असं अनिकेत तटकरे म्हणाले. अनिकेत तटकरे यांच्या आरोपांना आमदार महेंद्र दळवी यांनी उत्तर दिलंय. अनेकवेळा पक्ष बदलून बंडखोरी करणारं तटकरे कुटुंब आहे. जागा वाटपात अलिबागची जागा आम्ही भाजपला सोडली आहे. तिथं आम्ही महायुती म्हणून लढतो आहेत तिथं अनिकेत तटकरेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला महेंद्र दळवी यांनी दिलाय. जिल्ह्यात
नगरपालिका निवडणुकीचा जोर वाढायला सुरू झालेला असतानाच नाना पटोलेंनी भाजप नेत्याची घेतलेली भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आबिद सिद्दिकी यांची नाना पटोले यांनी भेट घेतली. सिद्दिकी हे मुस्लिम समाजाचे नेते असून मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
- त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
- मात्र सभेच्या आधीच त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असलेल्या दोन उमेदवारांवर गुन्हा दाखल
- त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे उमेदवार असलेले कैलास चौथे आणि शांताराम बागुल यांच्यावर सातपूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
- लोंढे टोळीतील फरार असलेल्या भूषण लोंढे याने कब्जा केलेल्या जमिनीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद भाजपासाठी महत्वाची
- मात्र त्या आधीच दोन उमेदवारांवर गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चाना उधाण
जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील १९ प्रभागांमधील प्रारूप मतदारांची प्रभागनिहाय यादी जाहीर करण्यात आली. परंतु मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे दिसून येत असून, चार दिवसांत एक हजार २३७ हरकती महापालिका प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या. यात तब्बल 'अ' गटात स्वतःच्या नावाबाबत ३६२ हरकती तर 'ब' गटानुसार १०५ जणांनी दुसऱ्यांच्या नावावर हरकती घेतल्या आहेत.
- सोलापूर शहरातील थंडीत झाली गायब
- गेल्या तीन दिवसात शहरातील रात्रीच्या तापमानात 5.1 अंश सेल्सिअसने वाढ
- 20 नोव्हेंबर रोजी 15.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले तापमान 23 नोव्हेंबर रोजी 20.5 अंश सेल्सिअस वर
- डिसेंबर पासून मात्र पुन्हा तापमानाचा पारा घसरून थंडी परतण्याचा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज
- उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वातावरणात निर्माण झाला होता गारठा
राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला यांनी विखरणी येथे कारवाई करून इतर राज्यातील दारूची अवैधरित्या तस्करी करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणणाऱ्या एकूण 5 जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईबाबत मात्र कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. दरम्यान येवला येथील कार्यालयात संबंधित आरोपींनी किती माल आणला कुठून आणला व कुठे विक्री करत होते याची चौकशी करत आहे.
नगरपरिषद निवडणूक प्रचारातही मोदींची क्रेझ पाहायला मिळत आहे. धाराशिव मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींचे मास्क घातलेले कार्यकर्ते पाहायला मिळाले.भाजप उमेदवारानी घरोघरी जात प्रचारावर भर आहे.आपल्या प्रभागात समस्या व विकासाचे आश्वासन देत नागरीकांना मतरुपी आश्वासन उमेदवारांकडून दिल जात आहे.
- अक्कलकोट तालुक्यात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकावर फिरवला रोटर
- सहा एकर वरील कांद्यावर बाजारात भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रोटर फिरून नष्ट केला.
- अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी रविकांत कुरे यांनी कांदा परवडत नसल्यामुळे उभ्या पिकावर रोटर फिरवला
- कांद्याला मिळणारा दुय्यम भाव, वाहतूक खर्च आणि भावाची अनिश्चितता त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा करावा लागतो सहन
- शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव जाहीर करावा, नाहीतर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल
- त्र्यंबकेश्वरपासून करणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात
- मुख्यमंत्र्यांची उत्तर महाराष्ट्र दौऱ्यातील प्रचाराची पहिली सभा त्रंबकेश्वरमध्ये
- तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज नाशिक जिल्ह्यात घेणार ३ जाहीर सभा
- सटाणा, मनमाड आणि सिन्नरमध्ये एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार
- जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीतलेच पक्ष आमने-सामने
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय बोलणार? याकडे लक्ष
सततच्या पावसामुळे शेवग्याची लागवड कोलमडले आहे नवीन हंगामाला अजून महिनाभर अवधी असल्याने बाजारात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे परिणामी शेवग्याचे दर अक्षरशः आकाशाला भिडले असून घाऊक बाजारात दहा किलोला तब्बल 3000 रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो पाचशे रुपये इतका विक्रमी किमतीला शेवग्याची विक्री होत आहे
राज्याच्या काही भागात जनावरांमध्ये पुन्हा लंबी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे ऑगस्ट नंतर काहीसा प्रसार कमी झाला होता मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे
पशुसंवर्धन विभागाच्या नोंदणी नुसार राज्यात 29,846 पशुधन बाधित झाले असून
यामध्ये 1050 पशुधनाचा मृत्यूची नोंद झाली आहे
बाधित परिसरामध्ये लसीकरण यावर भर दिला असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे
सलग चौथ्या दिवशी किमान तापमानाचा पारा तीन अंशाने वाढल्यामुळे शहरातील तापमान 17 अंशाच्या पुढे गेले. परिणामी शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे.
पहाटे आणि रात्री थंडी जाणवत आहे. पाषाण १६.२, शिवाजीनगर १६.७, कोरेगांव पार्क १९.५ असे किमान तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस शहरातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, आकाश निरभ्र राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव येथे सलग दुसऱ्या दिवशीही रात्री जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के...
काल रात्री 12 वाजताच्या सुमारास शिवनगाव मध्ये भूकंपाचे धक्के जानवल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण....
अचानक भूकंपाचे धक्के जनावल्याने ग्रामस्थ भीतीपोटी रात्री निघाले होते घरबाहेर.
काही महिन्यांपूर्वी शिरजगाव आणि शिवनगाव मध्ये ही जानावले होते भूकंपाचे धक्के...
यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक,अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम राबवली होती.यात ऑफलाइन प्रमाणपत्र आढळून आले त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी 21 कर्मचाऱ्यांना निलंबित केले या घटनेची शाई वाळत नाही तर पुन्हा यवतमाळ जिल्हा परिषदेत कार्यरत लाक्षणिक दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक,वैश्विक ओळख पत्र सादर केलेले कर्मचारीही रडारवर आले आहे.त्यांच्या प्रमाणपत्राबाबत शहंशाह वाटत असल्याने सियोनी विभाग प्रमुखांकडून त्या कर्मचाऱ्यांची नावे मागितली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यात आता प्रत्यक्ष फिजिकल तपासणीची धास्ती निर्माण झाली आहे
निवडणूक निर्णय अधिकारी,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बाजु मांडण्यासाठी समन्स
पूर्व सूचना न देता वगळले मतदार यादीतून नाव
यवतमाळ नगर परिषदेत माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी नगराध्यक्षपदासाठी केलाय नामांकन दाखल
मतदार यादीत नाव नसल्याचे कारण देत मडावी यांचा अर्ज बाद करण्यात आला होता.या आदेशा विरोधात मडावी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलीये
दरम्यान न्यायालय यावर उद्या अंतिम निकाल देणार,यवतमाळ करांच्या नजरा न्यायालयाच्या निकालाकडे
बदलापुरात निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार बदलापूरच्या आंबेडकर चौकात भाजपची सभा होती. त्याच भागातून बहुजन मुक्ती पार्टीची रॅली जात असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. डीजेच्या आवाजावरून बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. त्यानंतर बहुजन मुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. हाणामारीच्या या घटनेनं बदलापुरात निवडणूक प्रचाराला गालबोट लागलय.
आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून मंत्री जयकुमार गोरे यांनी निशाणा लगावला होता.
सोशल मीडियावर पोस्ट करून पक्ष चालत नाही तर जनतेमध्ये जावं लागतं असा टोला जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला होता. यावरून रोहित पवार यांनी गोरे यांन प्रतिउत्तर दिला आहे. आम्ही लोकांमध्येच आहे गोरे हे कदाचित नरेंद मोदी किंवा भाजपच्या नेत्यांवर यांच्यावर बोलले असतील असा उपरोधि रोहित पवार यांनी लगावला आहे. तर तुमचा इतिहास हा लोकांसमोर उघडा असून सर्वांना माहीत आहे. अजून बोलून उघडा करू नका, अन्यथा आम्ही लक्ष घातलं तर तुमची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रोहित पवारांनी गोरे यांना दिला आहे.
पुणे शहरातील औंध भागात बिबट्या आढळला. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आढळून स्थानिकांना बिबट्या दिसला. वन विभागाकडून आणि टीम रेस्कु कडून बिबट्याच्या शोध सुरू आहे. पहाटे ४ नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्या ही खुणा मिळून न आल्याची माहिती. बिबट्याचा ड्रोनने शोध घेतला जातोय.
जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर थेट टीका करत काँग्रेसची भाजपची बी टीम असल्याचे भाषणात सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा पक्षाच्या उमेदवारांचे मत खाण्यासाठी काही लोकांनी 50 लाख रुपये घेऊन नगराध्यक्षपदाची नगरसेवक पदाची उमेदवारी केली असल्याचा आरोपही त्यांनी जामखेड येथे झालेल्या भर सभेत केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आमदारकीचा अर्ज भरल्यानंतर तो मागे घेण्यासाठी मला सुद्धा काही लोकांची मोठी काळजी घ्यावी लागली होती.असेही त्यांनी यावेळी भाषणात सांगितले आहे भाजप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.