FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

FASTag Annual Pass Starts From Today: फास्टॅग वार्षिक पास आजपासून सुरु होणार आहे. हा पास तुम्ही ऑनलाइन कसा आणि कुठे काढायचा याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
FASTag Annual Pass
FASTag Annual PassSaam Tv
Published On

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आज १५ ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास सुरु होणार आहे. या पासमुळे वाहनधारकांना वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. वर्षभर किंवा २०० ट्रीपपर्यंत तुम्ही मोफत प्रवास करु शकतात. या नवीन फास्टॅग पासमुळे लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. वाहनचालकांचे पैसेदेखील वाचणार आहे. याचसोबत टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळता येणार आहे. दरम्यान, या पाससाठी तुम्हाला कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.

FASTag Annual Pass
FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

फास्टॅग पास कसा काढायचा? (FASTag Annual Pass Online Process)

फास्टॅग पास तुम्हाला ऑनलाइन अॅपवरुन काढता येणार आहे. राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra) किंवा NHAI/MoRTH च्या वेबसाइटवर किंवा अॅपवर जाऊन तुम्ही पास काढू शकतात. यासाठी तुम्हाला वाहनाचा नंबर आणि फास्टॅग आयडी टाकून लॉग इन करायचं आहे. यानंतर ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे ३००० रुपये भरायचे आहे. यानंतर तुमचा हा पास सध्याच्या फास्टॅगसोबत लिंक होणार आहे. त्यानंतर तुम्हाला फास्टॅग पास अॅक्टिव्हेशनचा मेसेज येईल.

FASTag Annual Pass
३००० रुपयांचा FASTag पास कधीपासून मिळणार? अर्ज कसा करावा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस घ्या जाणून

हा पास कुठे कुठे लागू असणार? (Where FASTag Annual Pass Implemented)

हा नवीन फास्टॅग पास NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर लागू असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर तुम्हाला या पासचा उपयोग करता येणार आहे. मुंबई-रत्नागिरी, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई-नाशिक, मुंबई-सुरत या महामार्गांवर हा पास लागू होणार आहे.राज्य किंवा महापालिकेच्या टोल प्लाझावर हा पास चालणार नाही. इथे तुम्हाला पैसे किंवा फास्टॅग रिचार्ज असलेला पास दाखवावा लागेल.

FASTag Annual Pass
FASTag Annual Pass: ३००० रुपयांचा वार्षिक FASTag मिळणार; तुमच्या मनातील १० प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com