Surabhi Jayashree Jagdish
भगवंताची कृपा असेल तर सर्व गोष्टी सुकर होतात. अशी काहीशी अनुभूती येण्याचा आजचा दिवस आहे.
आज विनायक चतुर्थी रिक्ता तिथी आहे. काही गोष्टी रिक्तपणे देऊन आपण रिक्त झालेले योग्य असते. अडचणींचा सामना करावा लागेल.
नको असलेल्या कटकटी मागे लागतील. कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल. पुढील गोष्टींची योग्य ती मांडणी केल्यामुळे या सर्व गोष्टीतून सुकर बाहेर याल.
मानसिक अस्वस्थता जाणवेल.कदाचित हळवेपण जास्त दाटेल .आपल्याच लोकांनी घात केल्यासारखी भावना आज होणार आहे.
उपासना, प्रवास, संततीसौख्य, विद्यार्जन, शेअर्स, लॉटरी, कला, क्रीडा, प्रेम, प्रणय, धनलाभ या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस चांगली संधी घेऊन आलेला आहे.
गृहसौख्य उत्तम राहील. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. कामांमध्ये प्रगती होईल.
पैशाची आवक-जावक चांगली राहील. तिखट मसालेदार पदार्थ खाण्यासाठी इच्छा होईल. कामाच्या ठिकाणी विनाकारण अडचणी उदभवतील.
मनाचे मनोरे फुलून येतील. स्वच्छंदी आनंद दिवस जगण्यासाठी विशेष खटाटोप कराल. स्वतःच्या प्रेमात धुंद रहाल.
संततीला काहीतरी अडचणी उद्भवतील. सहज सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. आज शक्तीने नाही तर युक्तीने काम करावे लागेल.
मोठी काही स्वप्न तुम्ही पाहिली असतील तर आज ती पूर्ण होण्याचा दिवस आहे. नव्याने परिचय होतील.
समाजकारण, राजकारणामध्ये प्रगती येतील. वेगवेगळे सन्मान लागतील. कामाच्या ठिकाणी यश असा काहीसा दिवस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.