Mukhyamantri Bal Aashirwad Yojana Saam Tv
बिझनेस

Fact Check: मुलांना महिन्याला 4000 रुपये, 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' चे मेसेज व्हायरल, नेमकं सत्य काय?

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana Viral Message: सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यात मुलांना ४००० रुपये दिले जातात. मात्र, ही योजना महाराष्ट्रात राबवली जात नाहीये.

Siddhi Hande

राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवतात. या योजनांबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज व्हायरल होत आहे. या योजनेत मुलांना दर महिन्याला ४००० रुपये दिले जातात, असे सांगितले जातात.परंतु अशी कोणतीही योजना राज्यात राबवण्यात आले नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.अशी कोणतीही योजना महाराष्ट्रात राबवण्यात आलेली नाही. कोणत्याही पोस्टला बळी पडू नका, असं आवाहन करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेच्या नावाने मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना आर्थिक मदत मिळते. अशा मुलांना दर महिन्याला ४००० रुपये दिले जातात.या योजनेसाठी अर्ज कसा करावा, याबाबतचीही माहिती देण्यात आली आहे. हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. या योजनेबाबत लोकांनी सरकारी कार्यालयात जाऊन माहितीदेखील विचारली आहे.

महिला व बाल विकास विभागाने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही. या सर्व अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.

बाल आशिर्वाद योजना हा महाराष्ट्रात राबवली जात नाहीये. इतर राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. या योजनेत मुलांना दर महिन्याला ४००० रुपये मिळतात. जेणेकरुन त्यांचे पुढचे भविष्य चांगले व्हावे. या योजनेचा मेसेज महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. मात्र, महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना राबवलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Shinde: पुण्यात बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक, धक्कादायक कारण आले समोर

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Political Row : भाजप मंत्री ऑन कॅमेरा भडकला! थेट तरुणाच्या कानशिलात हाणली; Video प्रचंड व्हायरल

Tilache Tel: रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडा, १५ दिवसांत दिसेत रिझल्ट

SCROLL FOR NEXT