EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; UPI आणि एटीएममधून काढता येणार PF; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO 3.0 Update: आता तुम्हाला पीएफचे पैसे यूपीआय किंवा एटीएममधून काढता येणार आहे. सरकार लवकरच EPFO 3.0 सेवा लाँच करणार आहे. यामुळे ईपीएफओ कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Siddhi Hande

EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

यूपीआय किंवा एटीएममधून काढता येणार पीएफ

प्रोसेस कशी असणार?

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. दरम्यान, आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना यूपीआयमधून प्रोव्हिडंट फंड काढता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, श्रम मंत्रालय सध्या या सिस्टीमवर काम करत आहे. यूपीआयमधून सध्याच्या पीएफ बॅलेंसमधून ७५ टक्के रक्कम काढता यावी, यासाठी काम सुरु आहे. याचसोबत मोबाईल अॅप आणि ईपीएफओ पोर्टलवर यासाठी विंडो तयार केली जाणार आहे.

कधीपासून सुरु होणार प्रोसेस? (EPFO 3.0 Starting Date)

सध्या श्रम मंत्रालय EPFO 3.0 वर काम करत आहे. लवकरच ही सेवा सुरु केली जाईल. हा अॅप एप्रिल महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. याद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटांत पीएफचे पैसे काढू शकतात.

सध्या ईपीएफओ या सिस्टीमच्या तांत्रिक गोष्टी चेक केल्या जात आहे. हे अॅप सर्वांसाठी सुरु करण्याआधी टेस्टिंग सुरु आहे. १०० डमी अकाउंटवर सिस्टीमची टेस्टिंग सुरु आहे. सध्या यूएएन पोर्टल, उमंग अॅपवर तुम्ही पीएफसंदर्भात सर्व कामे करु शकतात.

प्रोसेस कशी असणार? (EPFO 3.0 PF Withdrawal Through UPI Process)

ईपीएफओ 3.0 द्वारे तुम्ही यूपीआय आणि एटीएममधून पैसे काढता येणार आहे. यामध्ये तुमचे पीएफ अकाउंट आणि यूपीआय आयडी लिंक्ड असू शकते. याचसोबत तुम्हाला ईपीएफओकडून एक कार्ड दिले जाऊ शकते. या कार्डद्वारे तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतात. दरम्यान, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच सरकार अपडेट देईल, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Youtuber Killed: घरात घुसून 30 वर्षीय प्रसिद्ध युट्यूबरला संपवलं; मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने रचला कट, धक्कादायक कारण समोर

Post viral fatigue: ताप गेल्यानंतरही अशक्तपणा जात नाहीये? या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Plane Crash : हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू, देशावर शोककळा

Reel Star Prem Bhatia Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Matheran Trip Budget : मुंबई-पुण्याजवळचा स्वर्ग! माथेरान ट्रिपचा खर्च किती येतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT