Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही हॉटेलमध्ये झाली पार्टी; कोण कुठून आलं होतं?

Kharadi Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणातील नवीन अपडेट समोर आलीय. पुण्यातील स्टे बर्ड हॉटेलमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात अशाच प्रकारच्या पार्ट्या झाल्या होत्या.
Kharadi Rave Party
Kharadi Rave Party
Published On
Summary
  • खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात नवीन माहिती समोर

  • स्टे बर्ड हॉटेलमध्ये एप्रिल-मे महिन्यातही पार्टी

  • हॉटेल बुकिंग तपशील तपासले जात आहेत

  • पोलिसांकडून आता या आधीच्या पार्टींची चौकशी होणार

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे खराडीमधील रेव्ह पार्टी प्रकरणी नवीन अपडेट समोर आलीय. ज्या हॉटेलमध्ये डॉ. प्रांजल खेवलकर यांनी पार्टी केली होती. त्या हॉटेलमध्ये आधीही पार्टी झाली असल्याची बाब उघडकीस आलीय. एप्रिल, मे महिन्यात 'स्टे बर्ड' मध्ये पार्टी झाली होती. या रेव्ह पार्टीचा तपासासाठी आता मे- एप्रिल महिन्यात स्टे बर्ड मध्ये झालेल्या "हाउस पार्टी" ची चौकशी होणार आहे.

Kharadi Rave Party
Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

स्टे बर्डमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या पार्टीत ६ लोकांसाठी ३ रुम बूक करण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यात झाल्या पार्टीसाठी २ व्यक्तींसाठी २ रुम बूक करण्यात आल्या होत्या. स्टे बर्डमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या पार्टीत ६ लोकांसाठी ३ रुम बूक करण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यात झाल्या पार्टीसाठी २ व्यक्तींसाठी २ रुम बूक करण्यात आल्या होत्या.

Kharadi Rave Party
Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

याप्रकरणातील दुसरी अपडेट म्हणजे ज्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, तिथे प्रांजल खेवलकर हा शुक्रवारी मुक्कामी होता आणि शनिवारी दिवसभर त्या खोलीत होते. त्या रुममध्ये रविवारीही पार्टी होणार होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती आलीय. खराडीतील स्टे बर्ड हॉटेलमधील एका किचनसह स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये ही पार्टी सुरू होती.

प्रांजल खेवलकर यांच्या नावे दोन रुम बुक होत्या. त्यातील १०१ ही रुम एका रात्रीसाठीच बुक केली होती. त्यामुळे त्या रुममध्ये नेमके काय घडलं? ती रुम कशासाठी बुक केली होती? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

पोलिसांना बुक करण्यात आलेल्या दोन्ही रुमची बिले मिळाली आहेत. यातील रुम नंबर १०२ ही २५ ते २८ अशी बुक करण्यात आली होती. तीन रात्रींसाठी ही रुम बुक केली गेली होती. शुक्रवारी रात्री प्रांजल खेवलकर रुममध्येच मुक्कामी होते.

शनिवारीही दिवसभर प्रांजल खेवलकर रुममध्येच होते. त्यानंतर सर्वांनी शनिवारी रात्रभर पार्टी झाली. पार्टी सुरू असतानाच सकाळी पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com