EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

EPFO News: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पीएफचे पैसे मिळतात. दरम्यान, रिटायरमेंटनंतर किती कालावधीत तुम्ही पैसे काढू शकतात, हे जाणून घ्या.

Siddhi Hande

EPFO चे नियम

सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत काढू शकतात पीएफचे पैसे?

पीएफच्या पैशांवर किती व्याजदर मिळते?

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते.ही एक प्रकारची गुंतवणूक असते . पीएफचे हे पैसे तुम्हाला काही ठरावीक कामांसाठी किंवा रिटायरमेंटनंतर मिळतात. निवृत्तीनंतर किती कालावधीत पीएफचे पैसे काढू शकतात. याबाबत माहिती जाणून घ्या.

पीएफमधील रक्कमेवर तुम्हाला व्याजदर मिळते. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर पीएफ अकाउंट बंद होते का किंवा त्यावर मिळणारे व्याजदर बंद होते का असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेले असतात. यासाठी काही नियम तयार केले आहेत. तुम्ही नोकरी सोडल्यावर, नोकरी बदलल्यावर किंवा सेवानिवृत्तीनंतर पीएफचे पैसे काढू सकतात.

ईपीएफओ फक्त काही ठरावीक काळानंतर व्याज देते. यानंतर पीएफ अकाउंट बंद होते. दरम्यानन, किती कालावधीनंतर हे अकाउंट बंद होते ते जाणून घ्या.

रिटायरमेंटनंतर किती कालावधीपर्यंत मिळते व्याज

नियमांनुसार, कर्मचाऱ्यांनी जर ५५ ते ५८ वर्ष या कालावधीत नोकरी सोडली तर त्यांना ३ वर्षांसाठी व्याज मिळते. तुमच्या अकाउंटमध्ये कोणतेही कॉन्ट्रिब्युशन असो किंवा नसो तरीही तुम्हाला पैसे व्याज मिळते. जर तुम्ही ३ वर्षात पैसे काढले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाते.

पेन्शन कधी मिळते?

जर कर्मचारी ईपीएफओमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला १० वर्षानंतर पेन्शन मिळते. ही पेन्शन ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळते. तुम्ही ५० व्या वर्षापासून पेन्शन घेऊ शकतात मात्र, यामध्ये कपात केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT