PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

EPFO 3.0 PF Withdrawal From ATM: ईपीएफओ कर्मचारी आता लवकरच पीएफचे पैसे एटीएममधून काढू शकतात. लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे. दरम्यान, एटीएममधून पीएफचे पैसे कसे काढता येणार आहेत त्याबाबत माहिती जाणून घ्या.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएफचे पैसे लवकरच एटीएममधून काढता येणार

कधीपासून सुरु होणार सुविधा?

ईपीएफ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून EPFO 3.0 सुरु वाट पाहत आहेत. या नवीन सिस्टीममुळे अनेक कामे सोपी होणार आहेत. तुम्ही पीएफचे पैसे एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढता येणार आहे. पीएफ काढण्यासाठी सध्या अनेक कागदपत्रे लागतात. यासाठी खूप दिवसांची वाट पाहावी लागते. दरम्यान आता लवकरच एटीएममधून पीएफचे पैसे काढणार आहेत.

EPFO
EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एटीएममधून पीएफचे पैसे कधीपर्यंत काढता येणार? (When Wull Pf Withdrawn From ATM)

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, पीएफ काढण्याची प्रोसेस आता आणखी सोपी होणार आहे. EPFO 3.0 लाँच झाल्यानंतर तुम्ही एटीएममधून पीएफ काढू शकतात. यावर्षी जूनमध्येच ही सिस्टीम लाँच होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या या सिस्टीमसाठी टेस्टिंग सुरु आहे. लवकरच ही सेवा सुरु केली जाईल. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

EPFO
EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

ATM आणि UPI मधून पीएफ कसा काढायचा? (PF Withdrawal Through ATM and UPI)

पीएफचे पैसे एटीएम किंवा यूपीआयमधून कसे काढायचे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता पीएफ खाते यूपीआय आणि एटीएमशी जोडले जाण्याची शक्यता आहे. युजर्स सुरक्षित पिन, आधार आधारित ओटीपी आणि इतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला पैसे काढता येणार आहे. यासाठी लिमिट ठरवली जाणार आहे. ही सुविधा लाँच झाल्यानंतर पीएफ कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

EPFO 3.0 मध्ये काय बदलणार आहे? (EPFO 3.0 Changes)

PF स्टेट्‍स ट्रॅक करणे, बॅलेंस चेक करणे, केवायसी अपडेट,चुकीची माहिती सुधारणे,क्लेम फाइल करणे ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

EPFO
EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com