

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
पीएफ खाते ऑटोमेटिक होणार ट्रान्सफर
नोकरी बदलल्यावर ३-४ दिवसात पीएफ खाते होणार ट्रान्सफर
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. परंतु अनेकदा कर्मचारी नोकरी बदलतात तेव्हा पीएफ अकाउंटचं काय होतं, आपण पीएफ कसा ट्रान्सफर करु शकतो, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. दरम्यान आत ईपीएफ ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहे.
ईपीएफओने पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर करण्याची सिस्टीम सुरु केली जाणार आहे. २०२५ पर्यंत ही सेवा पूर्णपणे सुरु केली जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पीएफ बॅलेन्स नवीन नियोक्त्याच्या खात्यात आपोआप जमा केला जाणार आहे.
कर्मचारी भविष्य निधी संघटनेचा नवीन नियम
ईपीएफओने आता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे. आता तुम्ही ज्या कंपनीत आहात तेथील नियोक्त्याच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रान्शफर क्लेम पाठवण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही नियोक्त्याशिवाय ईपीएफओ अकाउंट ट्रान्सफर करु शकतात.
याआधी जेव्ही ईपीएफओ कर्मचारी नोकरी सोडून दुसरी नोकरी जॉइन करत असेल तेव्हा ईपीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक होती. या कामासाठी खूप वेळ वाट पाहावी लागायची. यामुळे आता हे काम सोपे होणार आहे.
काही दिवसांमध्ये होणार ईपीएफ ट्रान्सफर
कर्मचाऱ्यांना ईपीएफ ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म १३ भरावा लागायचा. यामुळे मॅन्युअल पद्धतीने अर्ज करावा लागायचा. यानंतर नियोक्त्याची मंजुरी मिळायची. त्यासाठी २ ते ३ आठवड्यांचा वेळ लागायचा. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑटोमॅटिक ईपीएफ ट्रान्सफर करण्यासाठी आता फक्त ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.