PF Rule Change: कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; पीएफच्या नियमात मोठा बदल आता पीएफ काढता येणार 100 टक्के

PF Rule Change Employees: सर्व कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय. पाहूया याचा कसा फायदा होणार.
PF Rules Payslip
EPFO announces major rule change — employees can now withdraw 100% of their Provident Fund balance.Saam Tv
Published On
Summary
  • कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठी घोषणा.

  • पीएफ खात्यातील 100 टक्के रक्कम काढण्याची परवानगी.

  • केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्याचा निर्णय घेतल्याने कोट्यवधी खातेधारकांना दिलासा मिळालाय.

PF ची रक्कम कशासाठी काढता येणार?

आजारपण, शिक्षण, लग्नासाठी पीएफचे पैसे काढता येणार

शिक्षणासाठी 10 वेळा रक्कम काढता येईल

लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढण्याची मुदत

आंशिक पैसे काढण्यासाठी 12 महिन्यांचा सेवा कालावधी

विशेष म्हणजे अंशतः पैसे काढण्याचे नियम सोपे आणि शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान 100 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांनी त्यांच्या योगदानाची 25 टक्के रक्कम कायम शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल. सध्या सदस्यांच्या शिल्लक रकमेवर वार्षिक 8.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. ईपीएफओच्या सदस्यांचे जीवनमान सुलभ करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे 13 गुंतागुंतीच्या नियमांची 3 श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे.

13 नियमांची 3 श्रेणीत विभागणी

1) अत्यावश्यक गरजा (आजारपण, शिक्षण, लग्न)

2) घराशी संबंधित कामे

3) विशेष/अपवादात्मक परिस्थिती

विशेष परिस्थितींमध्ये रक्कम काढताना आता कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे अनेक अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय डिजिटलायझेशनच्या दिशेने नवं पाऊल पडलंय. त्यामुळे पीएफ सेवा बँकिंगप्रमाणेच पूर्णपणे डिजिटल आणि ऑटोमॅटिक होतील. त्यामुळे साहजिकच ईपीएफओ सेवा पारदर्शक आणि जलद होऊन त्याचा फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com