EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO च्या नियमांत मोठा बदल! आता ऑनलाइन PF क्लेम करणे सोपे; २-३ दिवसांत खात्यात जमा होतील पैसे

EPFO New Rule: ईपीएफओने ऑनलाइन पीएफ क्लेम करणे खूप सोपे होणार आहे. ऑनलाइन पीएफ क्लेम करताना व्हेरिफिकेशन आणि कॅन्सल चेकची गरज नाही.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खात्यात (PF Account) पैसे जमा होतात. ईपीएओने ऑनलइन पीएफ काढण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. तुम्हाला ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी आधी कॅन्सल चेक जमा करावा लागायचा. आता हे सर्व करण्याची काहीही गरज नाही. याचसोबत तुमच्या नियोक्त्याच्या व्हेरिफिकेशनची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही बँक अकाउंटसाठी व्हेरिफिकेशन करणे अजूनच सोपे होणार आहे.

ईपीएफओने या नियमांत केले बदल (EPFO Rule Change)

कॅन्सल चेकची गरज नाही

आता तुम्हाला ऑनलाइन पीएफ क्लेम करताना कॅन्सल चेक अपलोड करण्याची गरज नाही.

नियोक्त्याच्या परवानगीची गरज नाही

आता तुमचे बँक अकाउंट आधार ओटीपीवरुन वेरिफाय होणार आहे.

बँक खाते बदलणे होणार सोपे

तुम्हाला जर यूएएन नंबर नवीन बँक अकाउंटशी लिंक करायचे असेल तर ओटीपी टाकून वेरिफाय करु शकतात.

पीएफ क्लेम करणे आणखी सोपे होणार

ईपीएफओचे जवळपास ८ कोटी सदस्य आहेत. त्यांच्या क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तुम्हाला जास्त कागदपत्रे अपलोड करावे लागणार नाही. याआधी बँक व्हेरिफिकेशनसाठई ३ दिवस लागायचे. नियोक्त्याच्या मंजुरीसाठी १३ दिन लागायचे. परंतु आता ही प्रक्रियाच नसणार आहे. त्यामुळे तुमचे काम लवकरात लवकर होणार आहे.

या नियमांमध्ये बदल झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम अधिक सोपे होणार आहे. याबाबत श्रम मंत्रालयाचे म्हणणे आहे की, कॅन्सल चेक आणि बँक अकाउंटच्या व्हेरिफिकेशनची गरज नाही. यूएएन आणि बँक अकाउंट लिंक केल्यावर तुमचे आपोआप व्हेरिफिकेशन होणार आहे. यामुळे कोट्यवधि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT