EPFO: आता पीएफचे पैसे UPI द्वारे झटपट काढा; ५ मिनिटांत खात्यात येतील पैसे; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

How To Withdraw PF Money Through UPI: आता तुम्ही यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहात. यासाठी तुम्हाला फक्त ही सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे.
EPFO
EPFOSaam Tv
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओने (EFFO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आता कर्मचाऱ्यांना यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा देणार आहे. यामुळे तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला ईपीएफओ एटीएम कार्ड देईल, असं सांगितलं जात आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन यूपीआयच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करु शकतात.

रिपोर्टनुसार, यूपीआय इंटिग्रेशनसाठी प्रक्रिया सुरु आहे. मे-जून महिन्यात ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांसाठी सुरु होईल. तुम्ही यूपीआयद्वारे १ लाखांपर्यंतच्या पीएफचे पैसे काढू शकतात. यामुळे तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे ट्रान्सफर करणे अगदी सहज सोपे होणार आहे. यूपीआयद्वारे पीएफचे पैसे कसे काढायचे? प्रोसेस जाणून घ्या.

EPFO
EPFO News: पीएफचे पैसे UPI द्वारे ५ मिनिटांत काढा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

PF चे पैसे यूपीआयद्वारे कसे काढायचे? (How To Withdraw PF Money Through UPI)

पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढण्याची प्रोसेस अद्याप सुरु झालेली नाही. परंतु लवकर ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सुरु होईल. हे पैसे कसे काढायचे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु कदाचित ही पद्धत खाली दिल्याप्रमाणे असू शकते.

  • सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये पेटीएम, फोन पे, गुगल पे हे अॅप डाउनलोड करायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचे आहे. जर तुम्ही आधीच यूपीआयसाठी अॅप डाउनलोड केले असेल तर दुसरे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

  • यानंतर तुम्हाला अॅपमध्ये EPFO Withdrawl हा पर्याय दिसेल. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होईल तेव्हा हा ऑप्शन दिसेल.

EPFO
आता काही सेकंदातच काढता येणार PF चे पैसे, EPFO 3.0 नक्की आहे तरी काय?
  • यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला पीएफ कशासाठी काढायचा आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. मेडिकल इमरजन्सी, होमलोन, उच्च शिक्षण यापैकी पर्याय निवडावा लागणार आहे.

  • यानंतर जेवढे पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाका आणि पुढे प्रोसेस करा.

  • यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. यानंतर तुम्ही ओटीपी टाका. हे पैसे तुमच्या बँक अकाउंट किंवा डिजिटल वॉलेटमध्ये येतील.

  • मात्र, अद्याप या प्रोसेसबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. त्याचसोबत यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची प्रोसेसही सुरु झालेली नाही.

EPFO
कॅन्सल चेक अन् व्हेरिफिकेशनची झंझट संपली; आता PF साठी ऑनलाइन क्लेम करणे होणार आणखी सोपं; EPFOची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com