EPFO Update Saam Tv
बिझनेस

EPFO Update: होळीला ३१ कोटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; PF खात्यावरील व्याजदर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय

EPFO PF Interest Rate Update: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज पीएफ व्याजदर निश्चित केले जाणार आहे. पीएफवरील व्याजदर कमी होणार की जास्त याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आज सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक

व्याजदर वाढणार की कमी होणार?

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओच्या पीएफ व्याजदरात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. ईपीएफओची सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक आज होणार आहे. या बैठकीत व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. यावर्षीसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज ८.२ ते ८.२५ टक्के व्याजदराची शिफारस करु शकते. ईपीएफओच्या या निर्णयाचा ३१ कोटी खातेधारकांना फायदा होणार आहे.

शेअर मार्केटमधील परतावा आणि बॉन्ड उत्पन्नामुळे हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदरात फार काही बदल न करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.२५ टक्के होता. २०२२ मध्ये व्याजदर ८.१ टक्के होता. यावर्षी हा व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

ईपीएफओ सीबीटी बैठक २ मार्चल होणार आहे. यामध्ये सर्व विषयांवर चर्चा केली जाऊ शकते.मागच्या वर्षभरात शेअर मार्केटमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती.यामुळे परतावा अपेक्षेनुसार मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्न कदाचित कमी असू शकते.

सोमवारी सीबीटी बैठकीपूर्वी गुंतवणूक समितीची बैठक होणार आहे. यामध्ये व्याजदराचा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर अर्थमंत्रालयाची मंजुरी दिली जाणार आहे. आज जो व्याजदर निश्चित केला जाईल तो ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाईल. यामुळे आजचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

EPFO 3.0 बाबतही चर्चा होण्याची शक्यता

ईपीएफओ सीबीटीच्या बैठकीत आणखी काही मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये EPFO 3.0 कधीपासून लाँच केले जाणार याबाबत निर्णय होऊ शकतो. ही सिस्टीम लाँच झाल्यावर तुम्हाला एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: होळीच्या दिवशी रक्तरंजित थरार, कुऱ्हाडीने ६ जणांवर सपासप वार; ३ महिलांसह एकाचा जागीच मृत्यू

IND vs WI: संजू सॅमसन आतापर्यंत प्लेइंग ११ मध्ये का नव्हता? शानदार खेळीचं काय आहे सीक्रेट? गौतम गंभीरनं केला धक्कादायक खुलासा

Animal glowing eyes: रात्रीच्या अंधारात प्राण्यांचे डोळे का चमकतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Sanju Samson Networth: मॅच विनर संजू सॅमसन किती कोटींचा मालक, त्याची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Live News Update : नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नऊ जणांना अटक

SCROLL FOR NEXT