EPFO Rule Saam Tv
बिझनेस

EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

EPFO Pension Scheme Basic salary Increase: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांची बेिक सॅलरी २५००० रुपये होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २५००० रुपये होणार

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालय लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांची इम्प्लॉयी पेन्शन स्कीम (EPS-95) अंतर्गत बेसिक सॅलरी लिमिट वाढवू शकते. कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन १५,००० रुपयांवरुन २५,००० रुपये करण्याची शक्यता आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)आणि श्रम मंत्रालयात या प्रसत्वावरुन चर्चा सुरु आहे. दरम्यान, जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर देशातील ६.५ कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. थेट कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. हा निर्णय EPFO 3.0 अंतर्गत घेण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्सुरिटी सिस्टीमला अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची Employee Pension Scheme (EPS-95) अंतर्गत बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन २५००० करण्याबाबत विचार सुरु आहे. दरम्यान, यावर निर्णय झाला तर दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडमध्ये १२५० ऐवजी १०८३ रुपये जमा केले जातील. २०२६ मध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या EPS 95 अंतर्गत तुमची बेसिक सॅलरी म्हणजे १५००० रुपयांनुसार पेन्शन फंडमध्ये पैसे जमा होतात. जर तुमचा पगार ३० किंवा ४० हजार असेल तर पेन्शन फंड फक्त १५००० रुपयांपर्यंत मर्यादित असतो.यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता १२ टक्के रक्कम जमा करतात. नियोक्त्याकडून जमा केलेली ८.३३ टक्क् पेन्शन फंडमध्ये जमा केली जाते. दरम्यान, आता दर बेसिक सॅलरी वाढली तर २५००० रुपयांच्या हिशोबाने पीएफ आणि पेन्शन फंडमध्ये पैसे जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT