Know How to check EPF Balance through mobile SMS and Umang App Saam TV
बिझनेस

EPF Balance Check: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

How To Check EPF Balance Via Phone: प्रत्येक कर्मचाऱ्याचे बँकेत ईपीएफ खाते असते. निवृत्तीनंतर आर्थिक बचत करण्यासाठी ईपीएफ हा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक कर्मचाऱ्याचे बँकेत ईपीएफ खाते असते. निवृत्तीनंतर आर्थिक बचत करण्यासाठी ईपीएफ हा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार आहेत. ईपीएफ खात्यात किती पैसे आहेत हे तुम्ही मोबाईच्या माध्यमातून चेक करु शकतात. हे कसे चेक करता येणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला दोणार आहोत.

ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम आपोआप कापली जाते. हे पैसे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळतात. यामघ्ये कर्मचाऱ्याचे योगदान १२ टक्के असते. तर नियोक्त्याचे योगदान १२ टक्के असते. हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात की नाही हे पाहण्याची सोपी पद्धत आहे.

ईपीएफओ सदस्य पासबुक पोर्टलद्वारे खात्यातील रक्कम तपासू शकतात.

यासाठी सर्वप्रथम ईपीएफओ सदस्य पासबुक पोर्टलला भेट द्या.

साइन इन करण्यासाठी तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका.

यानंतर पीएफ खाते निवडा. सर्व व्यव्हार पाहण्यासाठी View PF पासबुकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमच्या खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल.

उमंग अॅप

तुम्ही उमंग अॅपवरदेखील ईपीएफ खात्यातील रक्कम पाहू शकतात. भारत सरकारने उमंग अॅप लाँच केले आहे. यामध्ये तुम्हाला ईपीएफची माहिती मिळेल.

सर्वप्रथम तुम्ही उमंग अॅप उघडा. त्यात EPFO वर जा.

साइन इन करण्यासाठी UAN नंबर आणि पासवर्ड टाता. यानंतर तुम्ही ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम आणि इतर माहिती पाहू शकता.

ईपीएफ खात्यातील बॅलेंस रक्कम ऑफलाइन पद्धतीनेदेखील चेक करु शकतात. तुम्ही एसएसएसद्वारे किंवा मिस्ड कॉल देऊन माहिती मिळवू शकतात.

यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर नोंदणीकृत नंबरशी जोडला असणे आवश्यक आहे. तुम्ही 7738299899 यावर एसएमएस पाठवू शकता. येथे तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.

मिस्ड कॉल

जर तुमचा UAN नंबर मोबाईल नंबरशी जोडला गेला असेल तर तुम्ही 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. यानंतर तुमचा फोन आपोआप डिस्कनेक्चट होईल. तुम्हाला तुमच्या खात्यातील रक्कमेची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT