Chandrakant Jagtap
घरात विशिष्ट ठिकाणी पैसे आणि दागिने ठेवल्याने घरात समृद्धी आणि भरभराट राहते अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणि दागिने आणि कॅश ठेवल्यास कायम समृद्धी राहते.
घरात पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी दक्षिण दिशेचा कधीच उपयोग करू नका.
घरात पश्चिम दिशेलाही कधीच पैसे आणि दागिने ठेवू नये, हे शुभ मानले जात नाही.
वास्तुनुसार घरातील तिजोरी, पैसे आणि दागिने ठेवण्यासाठी उत्तर दिशा उत्तम मानली जाते.
पासबुक, चेकबुक, संपत्तीचे कागदपत्र इत्यादी देखील उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
उत्तर दिशेला ठेवलेल्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी श्रीयंत्र आणि कुबेराची मूर्ती स्थापित करावी.
घराच्या तिजोरीतून किंवा कॅशबॉक्समधून पैसे किंवा दागिने काढताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा.
टीप- ही संपूर्ण माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही मराठी याचे समर्थन करत नाही.