Samsung AI Refrigerators: आता फ्रिजचे तापमान सतत बदलायची गरज नाही; Samsung ने लॉन्च केले 3 AI Refrigerators; होईल वीजेची बचत

Samsung Launch 3 AI Refrigrator Price In India: घरात आपण रोज रेफ्रिजरेटर वापरतो. रेफ्रिजरेटवर वापरताना आपल्याला हवामानानुसार फ्रिजचे तापमान सतत बदलावे लागत होते. त्यामुळे आपली वीज जास्त प्रमाणात वापरली जात होती. मात्र, आता सॅमसंगने एआय रेफ्रिजरेटर लाँच केले आहे.
SAmsung AI Refrigerators: आता फ्रिजचे तापमान सतत बदलायची गरज नाही; Samsung ने लॉन्च केले 3 AI Refrigerators; होईल वीजेची बचत
Samsung Launch Next Generation Ai Inverter Compressor Refrigerator Know The Feature And SpecificationSaam TV
Published On

घघरात आपण रोज रेफ्रिजरेटर वापरतो. रेफ्रिजरेटवर वापरताना आपल्याला हवामानानुसार फ्रिजचे तापमान सतत बदलावे लागत होते. त्यामुळे आपली वीज जास्त प्रमाणात वापरली जात होती. मात्र, आता सॅमसंगने एआय रेफ्रिजरेटर लाँच केले आहे. त्यात तुम्हाला फ्रिजचे तापमान चेंज करण्याची गरज नाही. हे तापमान आपोआप बदलेल. त्यामुळे तुमच्या वीजेची बचत होईल.

सॅमसंग कंपनीने आज तीन नवीन रेफ्रिजरेटर्सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. जे ग्राहकांना त्‍यांच्‍या निवडी सानुकूल करण्‍यास मदत करत भारतीय कुटुंबांसाठी स्‍मार्टर राहणीमानाची खात्री देतात. नवीन रेफ्रिजरेटर्समध्‍ये सॅमसंगचे नेक्‍स्‍ट जनरेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-पॉवर्ड इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर आहे. सॅमसंगच्‍या नवीन रेफ्रिजरेटर्सचा मुख्‍य भाग एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर मोटर व ऊर्जा कार्यक्षमता ऑप्टिमाइज करत, तसेच वीजेची बचत करत पारंपारिक अंतर्गत डिझाइनला अधिक आकर्षक करतो.

सॅमसंगच्‍या आठव्‍या पिढीतील कॉम्‍प्रेसरमध्‍ये एआय आहे, जे २७ वर्षांपूर्वी लाँच करण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या कॉम्‍प्रेसरमध्‍ये क्रांतिकारी परिवर्तनाला सादर करते. एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर सेगमेंट-लीडिंग २० वर्ष वॉरंटीसह येतो, ज्‍यामधून दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमता व ऊर्जा कार्यक्षमतेची खात्री मिळते.

SAmsung AI Refrigerators: आता फ्रिजचे तापमान सतत बदलायची गरज नाही; Samsung ने लॉन्च केले 3 AI Refrigerators; होईल वीजेची बचत
405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

नवीन एआय रेफ्रिजरेटर्स तीन मॉडेल्‍समध्‍ये येतात - क्‍लीन चारकोल + स्‍टेनलेस स्‍टील रंगामध्‍ये ८०९ लीटर ४-डोअर फ्लेक्‍स फ्रेंच डोअर बीस्‍पोक फॅमिली हब रेफ्रिजरेटर आणि ग्‍लास फिनिशमधील क्‍लीन व्‍हाइट व स्‍टील फिनिशमधील ब्‍लॅक केव्हियर रंगामध्‍ये ६५० लीटर ४-डोअर कन्‍वर्टिबल फ्रेंच डोअर मॉडेल्‍स.

सॅमसंग बीस्‍पोक एआयसह होम अप्‍लायन्‍सेसच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करत आहे, ज्‍याअंतर्गत उच्‍च कार्यक्षम एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर असलेले रेफ्रिजरेटर्स प्रदान करत आहे, जे अपवादात्‍मक कार्यक्षमता देतात. एआय एनर्जी मोडचा वापर करत ग्राहक जवळपास १० टक्‍क्‍यांपर्यंत वीज बचत करू शकतात. सॅमसंग एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर्स आणि संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामुळे आमचे रेफ्रिजरेटर्स दीर्घकाळापर्यंत विश्‍वसनीयता आणि कमी ऊर्जा वापराची खात्री देतात,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेस बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक सौरभ बैशाखिया म्‍हणाले.

एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसरमध्‍ये सामान्‍य कार्यसंचालनादरम्‍यान ३५ dB/A पेक्षा कमी आवाज पातळी आहे, जे शांतमय लायब्ररीमधील वातावरणाइतके आहे. पारंपारिक निश्चित गती असलेल्‍या कॉम्‍प्रेसर्सच्‍या तुलनेत हे प्रगत तंत्रज्ञान तापमानामधील किरकोळ चढ-उतारांना त्‍वरित प्रतिसाद देते. ते ऑप्टिमल थंड हवा निर्माण करण्‍यासोबत सभोवतालचे तापमान, कार्यरत मोड आणि दरवाजा उघडणे व बंद केल्‍यामुळे तापमानात होणारे बदल अशा घटकांनुसार मोटर गतीमध्‍ये सुधारणा करत वीज वापर कमी करते.

सॅमसंग ८०९ लीटर फॅमिली हब™️ एआय रेफ्रिजरेटर नाविन्‍यपूर्ण ‘एआय व्हिजन इनसाइड' वैशिष्‍ट्य असलेल्‍या ८० सेमी फॅमिली हब™️ स्क्रिनसह येतो, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना अंतर्गत असलेल्‍या कॅमेऱ्यांच्‍या माध्‍यमातून फूड इन्‍व्‍हेण्‍टरीचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करता येते. हे कॅमेरे ३३ खाद्यपदार्थांना ओळखू शकतात, तर एआय तंत्रज्ञान पाककलांबाबत सल्‍ले मिळण्‍यास मदत करते. ६५० लीटर कन्‍वर्टिबल फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स एकीकृत वाय-फाय कनेक्‍टीव्‍हीटीसह येतात, ज्‍याद्वारे वापरकर्ते दुरून रेफ्रिजरेटरच्‍या सेटिंग्‍जवर देखरेख ठेवण्‍यासोबत व्‍यवस्‍थापन करू शकतात.

तसेच, एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसरची ऊर्जा कार्यक्षमता व टिकाऊपणा वाढवण्‍यासाठी सॅमसंग इंटर्नल मोटर, बॉल बीअरिंग्ज, पिस्‍टन्‍स, व्‍हॉल्‍व्‍ह्ज आणि इतर कम्‍पोनण्‍ट्सचे सतत संशोधन, विकास करण्‍यासोबत त्‍यांच्‍या उत्‍पादन प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करत आहे. परिणामत: एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसरने ९५ टक्‍क्‍यांहून अधिक इंटर्नल मोटर कार्यक्षमता संपादित केली आहे. मागील कॉम्‍प्रेसरच्‍या तुलनेत नवीन एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसरची ९५०-१,४५० आरपीएमच्‍या लो-स्‍पीड ऑपरेशन रेंजमधील ऊर्जा कार्यक्षमता देखील १० टक्‍क्‍यांहून अधिकने वाढली आहे. याव्‍यतिरिक्‍त, नवीन एआय इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसरने समकालीन मॉडेलच्‍या तुलनेत मोटरच्‍या कार्यसंचालनादरम्‍यान लीव्‍हरेज इनर्शिया (जडत्‍व) चौपटहून अधिक केले आहे.

किंमत

  • ८०९ लीटर ४-डोअर फ्लेक्‍स फ्रेंच डोअर बीस्‍पोक फॅमिली हब रेफ्रिजरेटर

    क्‍लीन चारकोल + स्‍टेनलेस स्‍टील रंग: ३५५००० रूपये

  • ६५० लीटर ४-डोअर कन्‍वर्टिबल फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स:

    ग्‍लास फिनिशमधील क्‍लीन व्‍हाइट रंग: १८८९०० रूपये

  • स्‍टील फिनिशमधील ब्‍लॅक केव्हियर रंग: १७२९०० रूपये

तीन नवीन रेफ्रिजरेटर्स आता Samsung.com, रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहेत.

SAmsung AI Refrigerators: आता फ्रिजचे तापमान सतत बदलायची गरज नाही; Samsung ने लॉन्च केले 3 AI Refrigerators; होईल वीजेची बचत
EPF Balance Check: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com