सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज एआयची बीस्पोक अप्लायन्सेसना दाखवले, ज्यामधून कनेक्टेड व शाश्वत घरांचे भवितव्य दिसून आले.
एआय-समर्थित होम अप्लायन्सेससह सॅमसंगचा झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रीमियम अप्लायन्सेस बाजारपेठेतील (Market) ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे.
इनबिल्ट वाय-फाय, इंटर्नल कॅमेरे आणि एआय चिप्ससह सॅमसंगचे बीस्पोक एआय असलेले नवीन अप्लायन्सेस स्मार्टथिंग्ज अॅप्लीकेशनच्या माध्यमातून सुलभपणे कंट्रोल्स उपलब्ध करून देत घरातील व्यवस्थापन सोयीस्कर करतात.
''आम्ही होम अप्लायन्सेसमधील भावी मोठे इनोव्हेशन बीस्पोक एआय सादर करत आहोत, ज्यामधून भारतातील घरांसाठी स्मार्टर राहणीमानाची खात्री मिळेल आणि ऊर्जा वापर कमी होईल, ज्यामुळे हरित पर्यावरणाप्रती योगदान देता येईल.
आमच्या बीस्पोक एआय (AI)-समर्थित होम अप्लायन्सेससह ग्राहक त्यांच्या निवडींना सानुकूल करू शकतील, प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी सहजपणे नियंत्रण ठेवू शकतील आणि त्यांच्या होम अप्लायन्सेसचे विनासायास डायग्नोसिस करू शकतील.
एआयच्या परिवर्तनात्मक क्षमतेसह आम्हाला विश्वास आहे की, बीस्पोक एआय भारतातील डिजिटल अप्लायन्सेस बाजारपेठेतील आमचे नेतृत्व अधिक दृढ करेल,'' असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
एआय या अप्लायन्सेसचा टिकाऊपणा व शाश्वतता वाढवण्यास देखील मदत करते, तसेच वापरकर्त्यांना त्यांच्या रेफ्रिजेरेटरचे वॉटर फिल्टर रिप्लेसमेंट करण्याबाबत किंवा एअर कंडिशनरमधील फिल्टर कधी बदलायचे आहे याबाबत स्मार्टथिंग्ज अॅपच्या माध्यमातून सूचना मिळते.
एआयच्या सादरीकरणासह सॅमसंगचा या अप्लायन्सेसच्या व्यवस्थापनासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा मनसुबा आहे. जिओ वर्ल्ड प्लाझा येथील सॅमसंग बीकेसी येथे 'बीस्पोक एआय' इव्हेण्टचे आयोजन करण्यात आले.
''एआयसह अप्लायन्सेस स्मार्टर होऊ शकतात आणि वापरकर्त्यांना घरातील कामांसाठी लागणरा वेळ व ऊर्जा कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते. सुधारित कनेक्टीव्हीटी आणि एआय क्षमतांसह हे अप्लायन्सेस स्मार्ट होम अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर नेतात. एआय अप्लायन्सेससह आमचा प्रिमिअम पोर्टफोलिओ प्रबळ करण्याचा आणि प्रीमियम अप्लायन्सेस विभागातील आमचा हिस्सा वाढवण्याचा मनसुबा आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे वरिष्ठ संचालक सौरभ बैशाखिया म्हणाले.
सॅमसंगच्या भारतातील बीस्पोक अप्लायन्सेसमध्ये रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशिनचा समावेश आहे, ज्यामध्ये आता एआयची शक्ती आहे.
रेफ्रिजरेटरमध्ये एआय व्हिजन कॅमेरा आहे, जो सुरूवातीला जवळपास ३३ खाद्यपदार्थांना आपोआपपणे ओळखण्यास मदत करतो. ओळखण्यात येऊ शकणाऱ्या खाद्यपदार्थांची संख्या वापरकर्त्याने काळासह केलेल्या स्टोरेजनुसार वाढेल. रेफ्रिजरेटर स्क्रिन्सच्या माध्यमातून लंच किंवा डिनरसाठी स्टोअर केलेल्या खाद्यपदार्थांनुसार काय शिजवावे याबाबत सल्ला देतो.
स्मार्ट फूड मॅनेजमेंट सिस्टमसह वापरकर्त्यांना रेफ्रिजरेटरमधील विशिष्ट खाद्यपदार्थ केव्हा नाशवंत होऊ शकतो याबाबत माहिती मिळू शकते. तसेच, सुधारित सिंगल कॅमेरा विविध प्रकाश स्थितींमध्ये मोठे व्ह्यू देतो. व्यापक कव्हरेजसह रेफ्रिजरेटर शेल्व्ह्जसह डोअर बिन्स देखील कॅप्चर होतात, ज्यामुळे कुठेही, कधीही रेफ्रिजरेटरचा आतील भाग पाहण्याची खात्री मिळते.
एअर कंडिशनरसाठी वेलकम कूलिंग वैशिष्ट्यासह वापरकर्ते दूर अंतरावरून देखील त्यांच्या घरामध्ये थंडावा निर्माण करू शकतात. एआय जिओ फेन्सिंग वापरकर्त्यांना कमांड्स सेट करण्याची सुविधा देते आणि स्मार्टथिंग्ज अॅप्लीकेशन विशिष्ट रेंज अंतर्गत असल्यास किंवा रेंजपासून दूर जात असल्यास अप्लायन्सेस चालू किंवा बंद करण्याबाबत नोटिफिकेशन पाठवते. विशिष्ट रेंज १५० मीटर ते ३० किलोमीटरपर्यंत आहे.
आहारविषयक पाककलांना वैयक्तिकृत करत बीस्पोक एआय 'लो फॅट' व्हर्जनसह पाककलेला आपोआपपणे कस्टमाइज करते.
एआय कंट्रोलसह सॅमसंगची नवीन फ्रण्ट लोड वॉशिंग मशिन काळासह लॉण्ड्री रूटिन्सना जाणून घेते आणि वापरकर्त्यांच्या कपडे धुण्याच्या पद्धतीनुसार वॉश सायकल्स तयार करते. वॉशिंग मशिन आपोआपपणे सर्वाधिक वापरण्यात आलेल्या वॉश सेटिंग्जनुसार अॅडजस्टमेंट करते, त्यामध्ये आणखी एक कस्टमाइज वॉश सायकल मॅन्युअली बदलले जात नाही तोपर्यंत बदल होत नाही. तसेच, एआय वॉश वैशिष्ट्य कपड्यांचे वजन, कपड्यांचा प्रकार व कपड्यांची कोमलता, पाण्याची पातळी, सॉइलिंग पातळी आणि डिटर्जंट पातळी यांना ओळखत सानुकूल वॉश चक्र तयार करते.
सॅमसंग होम अप्लायन्सेसचा सर्वोत्तम अनुभव देण्याप्रती समर्पित असण्यासोबत ते पर्यावरण व समाजासाठी सर्वोत्तम भविष्य निर्माण करण्यास मदत करू शकतील अशी उत्पादने निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहेत. स्मार्टथिंग्ज एनर्जीसह वापरकर्ते कनेक्टेड सॅमसंग अप्लायन्सेसकडून वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या प्रमाणावर देखरेख व नियंत्रण ठेवू शकतात.
वापरण्याच्या पद्धतीनुसार एआय अल्गोरिदमचा वापर करत सानुकूल ऊर्जा बचत करणाऱ्या पद्धतीसह एआय एनर्जी मोड रेफ्रिजरेटर्समध्ये जवळपास १० टक्के ऊर्जा बचत, एअर कंडिशनर्समध्ये जवळपास २० टक्के आणि वॉशिंग मशिन्समध्ये जवळपास ७० टक्के ऊर्जा बचत करू शकतात. बीस्पोक अप्लायन्सेससह सॅमसंग कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण देखील कमी करत आहे. उदाहरणार्थ, ५-स्टार प्रमाणित सॅमसंग रेफ्रिजरेटर प्रतिवर्ष ३५९ किग्रॅ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करते आणि एआय एनर्जी मोडसह बचतीमध्ये १० टक्क्यांची वाढ होते, ज्यामुळे एकूण कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन प्रतिवर्ष ३९५ किग्रॅपर्यंत कमी होते.
सॅमसंग बीस्पोक एआय अप्लायन्सेसमध्ये बिक्स्बी एआय वॉईस असिस्टण्ट आहे. वापरकर्ते 'हाय बिक्स्बी! शो मी व्हॉट्स इनसाइड द रेफ्रिजरेटर' किंवा 'हाय बिक्स्बी! टर्न ऑन द विंडफ्री मोड इन द एअर कंडिशनर' म्हणत त्यांच्या फॅमिली हब रेफ्रिजरेटरचे व्यवस्थापन करू शकतात.
या अप्लायन्सेसमध्ये स्मार्ट फॉरवर्ड सर्विस देखील आहे, ही सर्विस खात्रीदायी सुरक्षितता आणि अतिरिक्त एआय वैशिष्ट्ये जसे होम केअर यासह नियमित सॉफ्टवेअर अपडेट्सच्या माध्यमातून नवीन वैशिष्ट्ये व अपडेट्स देते. स्मार्टथिंग्ज होम केअर डिवाईसेसवर देखरेख ठेवते, अॅब्नॉर्मलिटीचे निदान झाल्यास त्याबाबत सूचना देते आणि सोल्यूशनचा सल्ला देते, ज्यामुळे डिवाईसेसचे सहजपणे मेन्टेनन्स करता येण्यासह अद्ययावत राहण्याची खात्री मिळते. वापरकर्त्यांना अॅक्सेसरी बदलण्याची गरज असताना देखील नोटिफिकेशन मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.