सॅमसंगने भारतात आपला जबरदस्त लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपचे नाव Samsung Galaxy Book 4 आहे. सॅमसंगने आपला नवीन लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसरसह सादर केला आहे. जो Galaxy Book 4 AI फीचर्ससह येतो. हे फीचर व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो रीमास्टरिंगमध्ये खूप मदत करते.
याआधी कंपनीने Samsung Galaxy Book 4 Pro, Samsung Galaxy Book 4 360 आणि Samsung Galaxy Book 4 360 लॉन्च केले होते. या लाइनअपमध्ये हा नवीन लॅपटॉप देखील अॅड झाला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Samsung Galaxy Book 4 ची प्रारंभिक किंमत 70,990 रुपये आहे. Galaxy Book 4 चा Intel Core 7 16GB रॅम सह आणला गेला आहे. ज्याची किंमत 85,990 रुपये आहे. हा लॅपटॉप ग्राहक ग्रे आणि सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. (Latest Marathi News)
हा लॅपटॉप सॅमसंग इंडिया वेबसाइट, ऑनलाइन स्टोअर्स आणि काही रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहक 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह देखील हा लॅपटॉप खरेदी करू शकतात.
सॅमसंगने आपल्या प्रेस नोटमध्ये जाहीर केले आहे की, Galaxy Book 4 खरेदी करणारे ग्राहक यावर 5,000 रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच यावर 4,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. विद्यार्थ्यांना याच्या खरेदीवर अतिरिक्त 10 टक्के सूट दिली जात आहे.
सॅमसंगच्या नवीन लॅपटॉप गॅलेक्सी बुक 4 मध्ये तुम्हाला 15.6-इंच फुल-एचडी (1,920 x 1,080 पिक्सेल) एलईडी अँटी-ग्लेअर स्क्रीन मिळत आहे. हा Intel Core 7 प्रोसेसर 150U CPU सह उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेज देण्यात आले आहे. या लॅपटॉपमध्ये Windows 11 Home प्री-इंस्टॉल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.