Pantone कॅमेरा, दमदार बॅटरीसह Motorola चा AI स्मार्टफोन लॉन्च! किंमत पाहा

Motorola Edge 50 Pro Specification : Motorola चा Edge 50 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. AI क्षमतेचा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. हा फोन Snapdragoan 7 Gen 3 चिपसेटसह बाजारात आला आहे.
Motorola Edge 50 Pro Specification, Price, Features
Motorola Edge 50 Pro Specification, Price, Features Saam Tv

Motorola Edge 50 Pro Price :

Motorola चा Edge 50 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. AI क्षमतेचा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. हा फोन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह बाजारात आला आहे.

या फोनच्या सुरुवातीची किंमत (Price) ३१,९९९ रुपये इतकी आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, हा पहिला एआय स्मार्टफोन (Smartphone) आहे, जो जगातील पहिला फ्रंट कॅमेरासह बाजारात लॉन्च करण्यात आला.

हा फोन बाजारात (Market) ९ एप्रिल २०२४ पासून विक्रीस येईल. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. एचडीएफसीच्या कार्डवरुन खरेदी केल्यास डिस्काउंट मिळेल.

Motorola Edge 50 Pro Specification, Price, Features
Shimla Manali Tour : पर्यटकप्रेमींसाठी IRCTC चा नवा टूर पॅकेज! एप्रिल महिन्यात फिरा शिमला-मनालीला; बुकिंग खर्च पाहा

1. किंमत

या फोनची किंमत 8GB रॅम 256GB स्टोरेजसाठी ३१,९९९ रुपये इतके असणार आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी ३५,९९९ रुपये मोजावे लागतील.

2. स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 Pro स्मार्टफोन IP68 रेट केला गेला आहे. हा फोन तीन कलरमध्ये कंपनीने दिला आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाची पॉलीड स्क्रीन आहे. फोनला 1.5K रिझोल्यूशन सपोर्ट देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. फोन 2,000 nits पीक ब्राइटनेससह येईल.

Motorola Edge 50 Pro Specification, Price, Features
Forbes Richest List 2024 : श्रीमंतांच्या यादीत भारतात मुकेश अंबानी 'नंबर वन',गौतमी अदानी दुसऱ्या स्थानावर; टॉप 10 भारतींयांची लिस्ट पाहा

यामध्ये युजर्सला ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट दिला आहे. Motorola Edge 50 Pro मध्ये हा जगातील पहिला AI पॉवर्ड प्रो ग्रेड कॅमेरा आहे. फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा, 13 MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच 10 MP टेलिफोटो लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे.

Motorola Edge 50 Pro Specification, Price, Features
Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान! अनलिमिटेड कॉल्स, दिवसाला २ जीबी डेटा अन् फ्री Prime Video Subscription; ऑफर्स पाहा

3. बॅटरी

Android 14 चा हा फोन Hello UI वर काम करेल. फोनला तीन प्रमुख अँड्रॉइड ऑपरेटिंग अपग्रेड्स देण्यात आले आहेत. तसेच ४ वर्षांची सिक्युरिटी अपडेटही देण्यात आली आहे. पावरबँकसाठी फोनमध्ये 4,500 mAh बॅटरी सपोर्टही देण्यात येत आहे. फोन 125W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग मिळत आहे. फोनमध्ये यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com